Jump to content

भगवंतगड


भगवंतगड
नावभगवंतगड
उंची{{{उंची}}}
प्रकारगिरिदुर्ग भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणजिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग{{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}


भगवंतगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

कसे जाल ?

मालवणपासून १६ कि.मी. वर असलेल्या मसुरे गावाजवळ खाडीच्या पलिकडच्या तिरावर हा किल्ला आहे.आता नवीन पुल तयार झाला आहे.पुल पार केल्यावर जवळपास 200 मीटर वरून डाव्या हाताला यु टर्न घेऊन बांदीवडे गावातून कालावल खाडीच्या तिरावरून साधारण 1.5 km अंतरावर एक छोट्या खाडीवर छोटा पुल आहे त्यावरून रिक्षा जाऊ शकते.मोठ्या चारचाकी गाडी घेऊन जाणे धोकादायक आहे.त्यापेक्षा खाडीच्या अलीकडे वाहन पार्क करून त्या छोट्या सिमेंटच्या साकवावरून चालत जाणे योग्य ठरेल. खाडी पार केल्यावर डाव्या बाजूला थोडे अंतर चालल्यावर लगेच गडाच्या पायथा लागतो. किंवा आचरा तिठा वरून भगवंत गड येथे येण्यासाठी राज्य शासनाच्या बसेस असतात.बसेस खूप कमी आहेत कारण तेथील लोकवस्ती खूप कमी आहे.आचरा हून रिक्षा देखील मिळतात.आचरा तिठ्या पासून जवळच पास 6 किलोमीटरवर हा गड आहे. आचरा तीठ्या वरून जाणे सोयीस्कर आहे.

इतिहास

सावंतवाडीचे सावंत आणि कोल्हापूरचे छत्रपती यांच्यात नेहमी वरचेवर लढाया होत असत, सन 1701 मध्ये सावंतांनी कलावल खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर भरत गड हा किल्ला बांधला त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपतींनी कालवल खाडीच्या उत्तर किनाऱ्यावरील चिंदर या गावी हा किल्ला बांधला.पुढे हा किल्ला सावंतवाडी करांनी जिंकला.पुढे 1748 साली आंग्रे यांनी गडावर चढाई केली परंतु किल्लेदाराने हा किल्ला मोठ्या चिकाटीने जवळपास दीड वर्ष लढवायला.

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

तटबंदी, भगवंताचे मंदिर, जुन्या बांधकामांचे अवशेष

गडावरील राहायची सोय

भगवंताच्या मंदिरात ७-८ जणांची रहायची सोय होऊ शकते

गडावरील खाण्याची सोय

गडावर खाण्याची सोय नाही.गडाच्या खाली होऊ शकेलं गावातील जनतेकडून होऊ शकेल पण पूर्व सूचना द्यावी लागेल.

गडावरील पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही

संदर्भ

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले