Jump to content

भक्तीगीत

भक्तिभावाने जी पद्यरचना, काव्य, अभंग, दोहा, ओवी...गायली जाते तिला भक्तीगीत म्हणतात. परमेश्वराप्रती भक्ती, श्रद्धा, आस, मनातील व्याकूळता, आर्तता इत्यादी भक्तिगीतातून प्रतीत होतात. भारतामध्ये वैदिक काळापासून भक्तिमार्गातुनच आराधना होत आहे. भक्तिगीत या गीतप्रकारामधून मनातील भक्तिरसांनी परिपूर्ण असणाऱ्या भावना व्यक्त केल्या जातात. अनेक संतमंडळी, उपासक, साधू हे भक्तिगीतातून परमे आळवणी-विनवणी करतात. या भक्तिगीतांची रचनाही त्यांच्या उत्स्फूर्त अशा श्रद्धेतुन निघालेली असते. भक्तिगीत या गीतप्रकारासाठी शास्त्रीय संगीत शिकावेच लागते असे नाही का भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शिकून येत नाहीत किंवा शिकताही येत नाहीत. शास्त्रीय संगीताचे ज्ञान असेल तर गीतप्रकार चांगला श्रवणीय होऊ शकेल. आज जी भक्तिगीते ऐकली जातात ती मात्र राग, ताल, लय, शब्द... इत्यादी गोष्टींवर आधारलेली असतात. गायकाच्या किंवा गायिकेच्या भावना त्यामध्ये भक्तिरसाचा परिपोष करतात, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, आर.एन.पराडकर इत्यादींच्या भक्तिगीतांमध्ये वरील सर्व वैशिष्ट्ये आढळतात, भक्तिगीत हे कोणत्याही रागात गायले जाते तरीसुद्धा कारुण्य उत्पन्न करणारे किंवा गोड परंतु आर्त, थोडेसे गंभीर असे उदाहरणार्थ तोडी, मालकंस, चंद्रकंस, माटवा असे राग वापरले जातात. संतांचे अभंग, दोहे, भक्तिकाव्ये, आरत्या, स्तुती-स्तवने इत्यादी रचना भक्तिगीते या प्रकारामध्ये येतात. या रचनांमधील भक्ती, श्रद्धा ऐकणान्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतात.[ संदर्भ हवा ]