Jump to content

भक्तराज महाराज

दिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज (जुलै ७, १९२० - नोव्हेंबर १७, १९९५) हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते.

त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत[], यांनी त्यांना 'भक्तराज' हे नाव दिले.

त्यांचे देशात व परदेशांत शेकडो भक्त आहेत. भक्तपरिवारात ते 'बाबा' या नावाने ओळखले जातात.

शिकवण

त्यांच्या संदेशाचे मुख्य सार म्हणजे : "भगवन्नामस्मरण व भजन यांद्वारे आनंदाचा अनुभव घ्या. सर्वांना भगवंतरूप व गुरूरूप मानून त्याग व निष्काम प्रेमाच्या माध्यमातून त्यांची सेवा करा."

याव्यतिरिक्त आत्यंतिक गुरुभक्ती व निष्ठा, भजनरचना व गायनाची अत्यंत आवड, भोजन उत्सव (भंडारा), भ्रमण ही त्यांच्या शिकवणुकीची इतर वैशिष्ट्ये आहेत.

आश्रम

भक्तराज महाराज ट्रस्ट यांचे, महाराष्ट्रमध्य प्रदेश येथे प्रत्येकी दोन अधिकृत आश्रम आहेत :

  1. भक्तवात्सल्य आश्रम, इंदूर, मध्य प्रदेश
  2. सद्गुरू सेवा सदन, मोरटक्का, खांडवा , मध्य प्रदेश
  3. श्री भक्तराज महाराज समाधी मंदिर, कांदळी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
  4. मोरचुंडी आश्रम, मोरचुंडी, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

उत्तराधिकारी

भक्तराज महाराजांचे गुरुबंधू 'रामानंदमहाराज' उर्फ 'रामजीदादा' हे त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत.

संदर्भ

  1. ^ 'नाथ माझा भक्तराज'; लेखक: वि.मा. पागे; तिसरी आवृत्ती (२००६), (भक्तराज महाराज चरित्र)

बाह्य दुवे