ब्लॅक बीनस् (वनस्पती)
ब्लॅक बीनस् इंग्रजी नाव –castanospermum austraie A.Cunn fabaceae
हे झाड ३०-४०असून त्या मानाने छोटे आहे.या छोट्या झाडाच्या फांद्यांवर लाल –पिवळ्या रंगाची फुले येतात.या झाडाचे शास्रीय नाव कॅस्टनोस्पर्मम ऑस्ट्राले. 'ब्लॅक बीनस' किंवा 'मोरेटॉन–बे चेस्टनट' म्हणून सुपरिचित असलेला हा वृक्ष ऑस्ट्रेलियामधील सदाहरित पर्जन्यमय जंगलात तर सापडतोच पण त्याची समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशातही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतात हा वृक्ष शोभिवंत वृक्ष म्हणून काही शहरामधून रस्त्याच्याकडेला लावलेला आढळतो. कोलकत्ता, लखनऊ , बेंगलोर या शहरांमधील उद्यानानमध्ये याची थोडी झाडे आढळतात. जिजामाता उद्यान येथेही एक झाड आहे.सदाहरित वर्गामध्ये मोडणारा हा वृक्ष शहरांमध्ये ५०-६० फुट उंच वाढतो. जंगलात याची वाढ १३० फुट झाल्याची नोंद आहे. झाडांची पाने गडद पण चमकदार हिरव्या रंगाची असून ‘संयुक्तपर्णी ‘ गटात मोडतात. फांद्या आसुपालवसारख्या .याची फुले खोडावर येतात व फांद्यांवरील पानांमुळे झाकली गेल्यामुळे सहसा दुरून दिसत नाही. फुले लाल पिवळ्या रंगाची असून पाकळ्या गडद व लाल रंगाच्या असतात. पुंकेसर सुरुवातीला लाल व नंतर पांढरे दिसतात. ओस्ट्रेलियामध्येहा वृक्ष सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये तो फुलतो. मुंबईत मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फुले येतात. फुलांमध्ये मध असून पक्षांमार्फत परागनाचे कार्य पार पाडते. ओस्ट्रेलियामध्ये मार्च-एप्रिलमध्ये झाडाला शेंगा येतात. हा वृक्ष शोभिवंत म्हणून लावला जात असला तरी त्याच्या मूळ देशात त्याचा पुरेपूर वापर करतात.झाडांची पाने व बिया दोन्हीही गाई-म्हशींना अपायकारक आहे.ओस्ट्रेलियातील आदिवासी बिया फोडून १० दिवस वाहत्या पाण्यात भिजत ठेवतात.असे केल्यामुळे त्यातील ‘सॅपोनीन ‘ नावाचे हानिकारक द्रव्य पाण्यात विरघळते. १० दिवसानंतर सॅपोनीनचा पूर्ण नायनाट करण्याकरिता बिया भाजून घेतात व नंतर त्याची भुकटी बरेच दिवस साठवून ठेवता येते.या भुकटीपासून नंतर केक बनवून खाल्ला जातो. या बियांमध्ये ‘कॅस्टनोस्परमाइन’ नावाचे अल्कलॉईड आहे. सध्या त्यावर HIV-AIDSच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन सुरू आहे.HIV विषाणूची इतरांवर मारा करण्याची क्षमता या कॅस्टनोस्परमाइनमध्ये आढळून आली आहे.
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची डॉ. मुग्धा कर्णिक