Jump to content

ब्रेट ली

ब्रेट ली
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावब्रेट ली
उपाख्यबिंग, बिंगा, द स्पिडस्टर
जन्म८ नोव्हेंबर, १९७६ (1976-11-08) (वय: ४७)
न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
उंची६ फु १ इं (१.८५ मी)
विशेषतागोलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने जलद
नातेशेन ली (भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.५८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९९५ – न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२००८-२०१० किंग्स XI पंजाब
२०११- कोलकाता नाइट रायडर्स
२०११ वेलिंग्टन
२०११– सिडनी सिक्सर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ७६ २२१ ११६ २६२
धावा १,४५१ ११७६ २,१२० १,३६५
फलंदाजीची सरासरी २०.१५ १७.८१ १८.५९ १७.०६
शतके/अर्धशतके ०/५ ०/३ ०/८ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ६४ ५९ ९७ ५९
चेंडू १६,५३१ ११,१८५ २४,१९३ १३,४७५
बळी ३१० ३८० ४८७ ४३८
गोलंदाजीची सरासरी ३०.८१ २३.३६ २८.२२ २४.०५
एका डावात ५ बळी १० २० १०
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३० ५/२२ ७/११४ ५/२२
झेल/यष्टीचीत २३/– ५४/– ३५/– ६२/–

१४ जुलै, इ.स. २०१२
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


ब्रेट ली (नोव्हेंबर ८, इ.स. १९७६) हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. लीला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली.[]

ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी सरासरी २० पेक्षा जास्त आहे. मायकल हसी सोबत १२३ धावांची सातव्या गड्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियन संघासाठी विकमी भागीदारी आहे.[]

लीचे उपाख्य 'बिंगा', न्यू साउथ वेल्स मधील बिंग ली ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या दुकानांवरून पडले.

ब्रेट ली कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी आयपीएल मध्ये खेळतो.[]

१३ जुलै, २०१२ रोजी ऑस्ट्रेलियन संघाच्या इंग्लंड दौऱ्या दरम्यान झालेल्या दुखापती नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेण्याचे घोषित केले. ली आयपीएल तसेच बिग बॅश लीग खेळत राहील. []

गोलंदाजी पद्धती

ली जलदगती गोलंदाजी साठी जाणल्या जातो व तो नियमित पणे १५० किमी/ता किंवा अधिक गोलंदाजी करतो. पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर (१६१.३ किमी/ता, १००.२ मा/ता) नंतर जलदगती गोलंदाजीत ब्रेट लीचा नंबर आहे.[] सातत्याने जलद गोलंदाजी केल्याने त्याला अनेक दुखापतींना सामोर जावे लागल. दुखापतीं पासून दुर राहण्यासाठी त्याने आपली गोलंदाजी पद्धती बदलली.[].

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लीची गोलंदाजी एक्शन चुकीची(क्रिकेट नियमांनुसार) असल्याचे म्हणले जायचे.[] तसेच अनेक बीमर चेंडू एकदिवसीय सामन्यात टाकल्या नंतर बराच गदारोळ झाला होता.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "HowSTAT! Player Analysis by Year". Howstat.com.au. 2011-07-15 रोजी पाहिले.
  2. ^ "HowSTAT! Partnerships (ODI)". Howstat.com.au. 2011-07-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Brett Lee heaps praise on KKR skipper Gautam Gambhir". 29 may 2012. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  4. ^ "Lee calls time on international career". Wisden India. 13 July 2012.
  5. ^ International Bowling Speeds. Cricinfo. Retrieved 2 February 2007.
  6. ^ "Farewell Brett Lee, a very modern purveyor of good old-fashioned pace". guardian.co.uk. 28 February 2010.
  7. ^ Polack, John (2 August 2000). "Lee's action cleared by ICC panel". Cricinfo. |access-date= requires |url= (सहाय्य)
  8. ^ "Lee beamer lands him in hot water again". Cricinfo. 4 July 2005. 11 April 2007 रोजी पाहिले.
  9. ^ "Beamers are not intentional – Ponting". Cricinfo. 28 February 2005. 16 April 2007 रोजी पाहिले.