Jump to content

ब्रूकलिन ब्रिज

न्यू यॉर्क शहराच्या मॅनहॅटन व ब्रूकलिन ह्या बरोंना जोडणारा ब्रूकलिन ब्रिज

ब्रूकलिन ब्रिज (Brooklyn Bridge) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक पूल आहे. १८८३ साली ईस्ट रिव्हरवर बांधला गेलेला व न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन व ब्रूकलिन ह्या बरोंना जोडणारा ब्रूकलिन ब्रिज हा अमेरिकेमधील सर्वात जुन्या व सर्वात प्रसिद्ध पुलांपैकी एक आहे.

या पूलाचा मूळ आराखडा जॉन ऑगस्टस रोबलिंगने तयार केला होता. बांधकाम सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा वॉशिंग्टन रोबलिंगने हा पूल बांधून पूर्ण केला.

बाह्य दुवे

गुणक: 40°42′20.48″N 73°59′47″W / 40.7056889°N 73.99639°W / 40.7056889; -73.99639