Jump to content

ब्रिजेट बिशप

ब्रिजेट बिशप (अंदाजे १६३२ - १० जून, इ.स. १६९२) ही अमेरिकेतील सेलम शहरात १६९२ च्या चेटूक खटल्यामध्ये दोषी ठरवून फाशी दिलेली पहिली स्त्री होती.

बिशप आपल्या घरात खानावळ चालवायची. तेथे शफलबोर्ड हा खेळ खेळला जायचा व वयात न आलेल्या व्यक्तींनाही येण्याजाण्यास मुभा असल्या कारणाने गावातील इतर लोकांचा तिच्यावर राग होता. ती मुद्दामहून त्याकाळी प्रचलित नसलेले लाल रंगाचे ट्युनिक घालायची. ती फटकळ व तोंडाळ होती व आपल्या तिसऱ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता ब्रिजेटच्या नावावर होणार होती. याकारणानेही ती चेटकीण असल्याचा तिच्यावर आरोप झाला असण्याची शक्यता आहे.

पाच लहान मुली व बायकांनी बिशपने आपल्यावर चेटूक केल्याचा आरोप ठेवला होता. याची शहानिशा होउन बिशपला दोषी ठरविले गेले व १० जून, १६९२ रोजी फाशी दिले गेले.