Jump to content

ब्रिक

जगाच्या नकाशावर ब्रिक
ब्रिकचे पुढारी डॉ. मनमोहन सिंग, दिमित्री मेदवेदेव, हू चिंताओ व लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा
ब्रिक्ससाठी ब्रिक्स बघा.

ब्रिक BRIC (बी. आर. आय. सी.) हा संक्षेपार्थाचा शब्द ब्राझील, रशिया, भारत, चीन ह्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बँक गोल्डमन सॅक्सने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.

ब्रिक्स राष्ट्र समूहाविषयी

गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन- अभ्यास करून आपले प्रमेय मांडले आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. या चार राष्ट्रांनी काय करावे हे गोल्डमन सॅकने कधीच सुचवले नाही वा त्यावर भाष्यपण केले नाही. परिणामतः जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी ही चार राष्ट्रं परस्परांजवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक राष्ट्रसमूहच आहे. २००८ साली ह्या चार राष्ट्रांचे पराराष्ट्रमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिक राष्ट्रांना अधिक जवळ येण्याची निकड वाटलीनी परिणामी १६ जून २००९ रोजी या चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे भरली.. विशेष गोष्ट अशी की, ब्रिकची चारही राष्टे ही जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या व प्रगतिपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत.

जी-२० या राष्ट्रसमूहात ब्रिकचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेले ब्रिकचे स्थान त्याला मिळालेच पाहिजे या दिशेने वाटचाल सुरू केली.. जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या चार राष्ट्रांनी परस्परांतले सहकार्यनी संघटन वाढविण्यावर भर दिला.

ब्रिकचे जगातील स्थान

मुद्दे ब्राझील ध्वज ब्राझीलरशिया ध्वज रशियाभारत ध्वज भारतFlag of the People's Republic of China चीन
क्षेत्रफळ३ / ४ (वादातीत)
लोकसंख्या
दरडोई उत्पन्न (२०१०) (आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार)११
दरडोई उत्पन्न (PPP) (२०११) (आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार)
निर्यात (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीनुसार)१८१४
आयात (जागतिक व्यापार संघटनेनुसार)१९१७११
विदेशी गुंतवणूक१६१२२९
परकीय चलन गंगाजळी
विदेशी कर्ज२५२०२९२२
सार्वजनिक कर्ज४७११७२९९८
वीजवापर१०
मोबाईल फोन्सची संख्या
इंटरनेटचा वापर११

हे सुद्धा पहा

संदर्भ