Jump to content

ब्राह्मोस क्षेपणास्त्र

ब्राह्मोस क्षेपणास्त्र

ब्राह्मोस (रोमन लिपी: BrahMos ;) हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था, या दोघांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. याचा पल्ला ३०० किलोमीटर अंतरापर्यंत आहे.

स्वरूप

ब्राह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा, आणि रशियातील मोस्कवा या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते २.८चा वेग गाठते. अमेरिकेच्या हार्पून (क्षेपणास्त्र) या सबसॉनिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग मॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.

हे क्षेपणास्त्र बहुपयोगी असून जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता यात असल्यामुळे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे.

इतिहास

ब्राह्मोस क्षेपणास्त्र
पाणबुडीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र
सुखोई विमानावर ब्राह्मोस क्षेपणास्त्र

भारताला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशियाच्या 'पी-७०० ग्रानित' या क्षेपणास्त्रावर आधारलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणून विकसवायचे होते. मात्र रशियाने "क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंध करारास" बांधील असल्याने हे क्षेपणास्त्र पी-८०० ओनिक्स या निम्न पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर आधारून विकसवले. या क्षेपणास्त्राचे प्रणोदन रशियन क्षेपणास्त्रावर आधारित असून मार्गदर्शन ब्राह्मोस कॉर्पोरेशनेने विकसित केले आहे.

हे सुद्धा पहा

  • एचजीव्ही-202एफ

बाह्य दुवे

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑगस्ट २, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)