ब्राह्मणवाद
जात, वंश, रंग, देश, इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वतःला तसेच स्वतःच्या जातीसमूहाला श्रेष्ठ समजणे म्हणजेच ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे. अनावश्यक श्रेष्ठत्वास इंग्रजीत superiority complex (सुपरिअॅरिटी कॉम्पलेक्स) असे म्हणतात. हा एक प्रकारचा विकार असल्याचे आधुनिक मानसशास्त्रज्ञ मानतात. भारतात ही संज्ञा प्रामुख्याने ब्राह्मणांच्या जातीयवादासाठी वापरली जाते. मात्र, ब्राह्मण जातीत जन्मलेली व्यक्तीच ब्राह्मणवाद करते, असे नव्हे. जन्माने ब्राह्मण नसले तरी अण्णा हजारे यांच्यावर ब्राह्मणवादी असल्याचा आरोप झाला होता. अण्णांचे एक सहकारी स्वामी अग्निवेश यांनी हा आरोप केला होता.[१] ब्राह्मणवाद ही भारतातील मूलभूत समस्या असल्याचे मानले जाते. भारतातील बहुजन समाजातून ब्राह्मणवादाचा सातत्याने धिक्कार होत आला आहे. ब्राह्मणवादाला विरोध करताना, अनेकदा ब्राह्मण जातीवर टीका केली जाते. मात्र, ब्राह्मणवादाला विरोध ब्राह्मण जातीला विरोध नव्हे. येथे ब्राह्मणवाद या प्रवृत्तीला विरोध अपेक्षित आहे. [२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "ब्राह्मणवाद चला रहे हैं अन्ना : अग्निवेश" (हिंदी भाषेत). ७ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "ब्राह्मणवाद संपूर्ण भारताची समस्या". ७ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]