ब्रह्मचारी (मराठी चित्रपट)
ब्रह्मचारी हा एक इ.स. १९३८ मधील मराठी भाषेतील कृष्ण धवल चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते आणि प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिले होते. या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर यांच्यासह मुख्य भूमिकेत स्वतः मास्टर विनायक यांनी मुख्य भूमिका साकारली होती.[१] हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्रवादी संघटनेवर निशाणा साधणारा राजकीय उपहास होता. हा चित्रपट हिंदी भाषेतही बनला होता.[२]
इ.स. १९३७ मधील मराठी चित्रपट धर्मवीर नंतर अत्रे यांचा मास्टर विनायक बरोबरचा हा दुसरा चित्रपट होता. विनोदी संवाद आणि उपहासात्मक थीम व्यतिरिक्त हा चित्रपट मीनाक्षी शिरोडकरांच्या स्विमूट सूट परिधान करणाऱ्या मोहक गाण्याच्या सीक्वेन्ससाठी लोकप्रिय झाला.
कथानक
औदुंबर हा एक तरुण आणि सामान्य युवक असतो. एक दिवस तो देशभक्त जटाशंकर यांनी दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी जातो. जटाशंकर आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्व, शिस्त आणि ब्रह्मचर्य याचे महत्त्व विशारद करतात. या भाषणा वरून औदुंबर प्रेरित होऊन आचार्य चंडीराम यांच्या संघटनेत सहभागी होतो. तो आपल्या लैंगिक वासनांचा त्याग करतो आणि चित्रपट कलाकारांच्या पोस्टर्स आपल्या घरातून काढून टाकतो.
दरम्यान तो किशोरी नावाच्या एका युवतीशी त्याचा संपर्क होतो आणि येथेच त्याच्या ब्रह्मचर्याची सत्त्वपरीक्षा घडते. किशोरी औदुंबरला अनेकदा मोहात पाडते पण औदुंबर तिचा मोह बाजूला सारून स्वतःला सांभाळतो. या गोंधळात किशोरी स्वतःला इजा झाल्याचे नाटक करून औदुंबरला मदतीसाठी हाक मारते. औदुंबर कडे शेवटी कोणताही पर्याय नसतो आणि तो तिला उचलून घेतो. त्याच वेळी तिचे वडील आणि असोसिएशन मधील ईतर लोक तेथे येतात. भीती आणि लज्जेपोटी किशोरी किंचाळते आणि औदुंबरवर छेडछाडीचा आरोप करते. काही दिवसांनी औदुंबर साहित्य विक्री करत असताना पुन्हा एकदा त्याची किशोरीशी गाठ पडते. तेव्हा आचार्य चंडीरामच्या संघटनेतील एक सदस्य तेथेच असतो. प्रथम औदुंबर तिच्याशी तुसडीने वागतो, पण लवकरच किशोरी त्याचे मन जिंकते. परत नंतर औदुंबर किशोरीशी भांडण करतो. यामुळे किशोरीला रडू येते. तिचे वडील तिची सांत्वना करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. किशोरीबरोबर गेलेला सदस्य तिच्याकडे आकर्षित होतो. अखेर औदुंबर सरांना सत्य परिस्थिती सांगतो आणि शेवटी औदुंबर किशोरीशी लग्न करतो.
कलाकार
- मास्टर विनायक - औदुंबर / कन्हैया (हिंदी आवृत्तीत)च्या भूमिकेत
- मीनाक्षी शिरोडकर - किशोरीच्या भूमिकेत
- व्हीजी जोग
- साळवी
- दामुअण्णा मालवणकर - आचार्य चंडीरामच्या भूमिकेत
- जावडेकर देशभक्त जटाशंकर म्हणून
- वसंत एरिक
संदर्भ
- ^ "Meenakshi Shirodkar was the first Marathi actress to wear a swimsuit onscreen". The Times of India (इंग्रजी भाषेत). २१ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ Phukan, Vikram (2019-05-03). "Has cinema's portrayal of the Hindu Right gone from sharp satire to soft-focus glow?". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. २१ मे २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ब्रह्मचारी चे पान (इंग्लिश मजकूर)