Jump to content

ब्रसेल्स विमानतळ

ब्रसेल्स विमानतळ
Luchthaven Brussel-Nationaal (डच)
Aéroport de Bruxelles-National (फ्रेंच)
आहसंवि: BRUआप्रविको: EBBR
BRU is located in बेल्जियम
BRU
BRU
बेल्जियममधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ब्रसेल्स
स्थळ फ्लाम्स ब्राबांत प्रांत
हबब्रसेल्स एअरलाइन्स
जेट एअरवेज
सौदिया कार्गो
सिंगापूर एअरलाइन्स कार्गो
समुद्रसपाटीपासून उंची १८४ फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक)50°54′5″N 4°29′4″E / 50.90139°N 4.48444°E / 50.90139; 4.48444
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
01/19[]9,800 2,987 डांबरी
07R/25L 10,535 3,211 डांबरी
07L/25R 11,936 3,638 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी 21,933,190
मालवाहतूक (टनांमध्ये) 453,954
विमाने 231,528
Sources: Brussels Airport,[]
येथून उड्डाण करणारे डेल्टा एरलाइन्सचे बोइंग ७५७ विमान

ब्रसेल्स विमानतळ (डच: Luchthaven Brussel-Nationaal, फ्रेंच: Aéroport de Bruxelles-National) (आहसंवि: BRUआप्रविको: EBBR) हा बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ब्रसेल्स शहराच्या ११ किमी ईशान्येस फ्लांडर्स भागात स्थित असलेला हा विमानतळ २०१३ साली युरोपमधील २५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

दुसऱ्या महायुद्धकाळामध्ये बेल्जियम नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असताना इ.स. १९४० साली नाझींनी हा विमानतळ बांधला. जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर १९४८ साली बेल्जियम सरकारने हा विमानतळ वापरण्याचे ठरवले व येथे अनेक सुधारणा केल्या. ब्रसेल्स एरलाइन्स ह्या बेल्जियमच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य वाहनतळ येथेच आहे.

हे सुद्धा पहा

  • ब्रसेल्स शार्लरुआ विमानतळ

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2019-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
  2. ^ "BRUtrends 2010 by Johan Bockstaele". ISSUU.

बाह्य दुवे