बौद्ध साहित्य
बौद्ध धर्म |
---|
बौद्ध साहित्य किंवा बौद्ध वाङमय हे बौद्ध धर्माशी संबंधित ग्रंथ साहित्यकृती आहे. बौद्ध साहित्य मुख्यतः पाली, संस्कृत व प्राकृत भाषेसह विविध देशांतील प्रादेशिक भाषेत निर्माण झाले आहे. बौद्ध साहित्य इतके विशाल आहे की, कोणताही एक व्यक्ती आयुष्यभरही संपूर्ण बौद्ध साहित्य वाचू शकत नाही. थेरवादी बौद्धांनी पाली भाषेत बुद्धांची शिकवण जतन करून याच भाषेत बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला तर महायानी बौद्धांनी भक्कमपणे संस्कृत भाषेत बुद्ध शिकवण जतन करून संस्कृत मधूनच त्याचा प्रचार-प्रसार केला. बुद्धांनी भिक्खुंना आदेश दिला होता की, त्यांनी आपली वचने आपापल्या भाषेत परावर्तित करावीत. वैदिक (संस्कृत) भाषेत आपला उपदेश परावर्तित करायला मात्र त्यांचा विरोध होता. कारण ही भाषा सर्वजनांची लोकभाषा नव्हती, म्हणून बौद्ध धर्माचे ग्रंथ प्राकृत व पाली भाषेत आढळतात.[१]
इ.स.च्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून संस्कृत भाषेची प्रतिष्ठा वाढल्याने संस्कृत, तिबेटी आणि चीनी या भाषेतही बौद्ध साहित्य पुष्कळच निर्माण झाले.
बौद्ध साहित्याचा भांडारात पाली त्रिपिटक हा सर्वात प्राचीन व संपूर्ण उपलब्ध असा ग्रंथ आले. त्याची तीन भागात व्यवस्थित विभागणी केली आहे. मिलिंदपन्ह, नेत्तिपकरण, बुद्धदत्त लिखित भाष्ये, दिपवंस, महावंस, चूलवंस, जातक कथा यांचा समावेश बौद्ध साहित्यात होतो. विसुद्धीमग्ग हा बुद्धघोषाचा ग्रंथ तर प्रारंभिक बौद्ध धर्माचा विश्वकोशच मानला जातो.
विविध भाषेतील बौद्ध साहित्य
पाली भाषेतील ग्रंथ
- त्रिपिटक - पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. या ग्रंथात त्रिपिटक हा ग्रंथ फार मोठा व अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महाभारत ग्रंथाच्या तिपटीने मोठा असून त्याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लक्ष आहे. या ग्रंथाची भाषांतरे सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, वगैरे अनेक भाषांतून झाली आहेत. या ग्रंथाला त्रिपिटक हे नाव पडण्याचे कारण त्याचे तीन पिटक (पुडे) म्हणजे भाग आहेत. ते खालील प्रमाणे:
- विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
- पाराजिका
- पाचितियादि
- महावग्ग
- चुल्लवग्ग
- परिवारपाठ.
- सुत्तपिटक - यात बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे. याचे पाच मोठे ‘निकाय’ (पोटभाग) आहेत.
- दिर्घनिकाय
- मझिम निकाय
- संयुक्तमिकाय
- ॲगुत्तरनिकाय
- खुद्द्क निकाय - यांत बुद्धांनी आपल्या शिष्यांशी केलेले संवाद आहेत. खुद्द्कनिकायाचे पुनः १५ पोटविभाग आहेत.
- खुद्दकपाठ
- धम्मपद
- उदान
- इतिवुत्तक
- सुत्तनिपात
- विमानवत्थु
- पेतवत्थु
- थेरगाथा
- थेरीगाथा
- जातक
- निद्देस
- पटिसंभिदामग्ग
- अवदान
- बुद्धवंस
- चरियापिटक
- अभिधम्मपिटक - यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे विवेचन आहे. यात सात भाग आहेत.
- धम्मसंगणि
- विभंग
- धातुकथा
- पुग्गलपज्जत्ति
- कथावत्थु
- यमक
- पठ्ठान
- विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
- मिलिंदपन्हो
- दीपवंस व महावंस
संस्कृत भाषेतील ग्रंथ
तिबेटी भाषेतील ग्रंथ
- क्यांग-र
- ग-छेररोल्प
चिनी भाषेतील ग्रंथ
- महाभिनिष्क्रमणसूत्र
- महापरिनिर्वाणसुत्त
- जातक-निदान
- महावंस
या ग्रंथांची चिनी भाषांतरी झालेली आहेत.
ब्रह्मी भाषेतील ग्रंथ
म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांचे ब्रह्मी भाषेत भाषांतरे झालेली आहेत.
सिंहली भाषेतील ग्रंथ
- दीपवंस
- महावंस — (लेखक- महानाम)
- ज्ञानोदय
जपानी भाषेतील ग्रंथ
मराठी भाषेतील ग्रंथ
- बुद्ध, धर्म आणि संघ — धर्मानंद कोसंबी
- धम्मपदं (नवसंहिता) — आचार्य विनोबा भावे
- धर्म व धर्मपंथ — प्र.न. जोशी
- बुद्ध संप्रदाय आणि शिकवण — चिं.वि.जोशी
- बौद्ध विचारधारा — संपादक- महेश देवकर, लता देवकर व प्रदीप गोखले
- श्रीहर्ष — पारखीशास्त्री
- बौद्धदर्शनसार — बापटशास्त्री
- बौद्धपर्व — वा. गो. आपटे, २०१३
- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बंगाली भाषेतील ग्रंथ
- बुद्धदेव — प्रो. सतीशचंद्र विद्याभूषण
- बौद्धधर्म — सत्येंद्रनाग टागोर
इंग्लिश भाषेतील ग्रंथ
- दि लाईट ऑफ एसिया — एड्वीन अर्नोल्ड, १८७९
- दि गोस्पेल ऑफ बुद्ध — पॉल कॅरस, १८९४
- बुद्धिझम इन् ट्रान्सलेशन्स — हेन्री क्लर्क वॉरेन, १८९६
- सम सेईंग्स ऑफ द बुद्ध — एफ. एल. वुडवर्ड, १९२५
- अ बुद्धिस्ट बायबल — ड्वाइट गोडार्ड, १९३२
- अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स — ई. जे. थॉमस, १९३५
- दि वेदांतिक बुद्धिझम ऑफ दि बुद्ध — जे. जी. जेनिंग, १९४७
- दि टिचिंग्स ऑफ दि कंपॅशनेट बुद्ध — इ. ए. बर्ट, १९५५
- दि बुद्ध अँड हिज् धम्म — भीमराव आंबेडकर, १९५७
- गौतम दि बुद्ध : हिज लाईफ अँड हिज टिचिंग्स (विपस्सना रिसर्च इन्सिट्युट,धम्मगिरी)
- बुद्धिझम अँड मॉडर्न थॉट्स — इ. जी. टेलर
- बुद्धिझम — ई. जे. मिल्स
- बुद्धिझम ईथिक्स — डबल्यू. टी. स्टेस
- बुद्धिझम ऑफ विझ्डम अँड फेइथ् — थिच थेईन् ताम, १९९१
- व्हॉट दि बुद्ध टॉट् — वालपोल राहुल, १९५९
- लिवींग धम्म — वेनेरेबल अजाह्न चाह
- व्हॉट बुद्धिस्ट बिलींव्ह — वेन. के. श्री धम्मानंद, १९९३
- आउटलाइन्स ऑफ् महायान बुद्धिझम — डी. टी. सुजुकी, २००५.
हिंदी भाषेतील ग्रंथ
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहावा