बोगनव्हिल मोहीम
बोगनव्हिल मोहीम
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
मार्च १९४४मध्ये बोगनव्हिल द्वीपावर जपानी सैनिकांचा माग काढणारे अमेरिकन सैनिक
दिनांक | १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ |
---|---|
स्थान | बोगनव्हिल, पापुआ न्यू गिनी |
परिणती | दोस्त राष्ट्रांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
| साचा:देश माहिती जपानचे साम्राज्य |
सेनापती | |
डग्लस मॅकआर्थर विल्यम एफ. हॅल्से थियोडेर एस. विल्किन्सन अलेक्झांडर व्हँडग्रिफ्ट आर.ए. रोव ॲलन एच. टर्नेज रॉबर्ट एस. बेटलर रॉय गायगर ऑस्कर ग्रिसवॉल्ड हॅरोल्ड बॅरोक्लाउ थॉमस ब्लेमी स्टॅनली सेव्हिज | साचा:देश माहिती जपानी साम्राज्य हितोशी इमामुरा साचा:देश माहिती जपानी साम्राज्य हारुकिची ह्याकुताके साचा:देश माहिती जपानी साम्राज्य मिनेइची कोगा साचा:देश माहिती जपानी साम्राज्य जिनिची कुसाका साचा:देश माहिती जपानी साम्राज्य तोमोशिगे सामेजिमा साचा:देश माहिती जपानी साम्राज्य सेंतारो ओमोरी साचा:देश माहिती जपानी साम्राज्य कियोतो कगावासाचा:KIA साचा:देश माहिती जपानी साम्राज्य मसाताने कंदा |
सैन्यबळ | |
१,४४,००० अमेरिकन सैनिक ३०,००० ऑस्ट्रेलियन सैनिक[१] ७२८ विमाने[२] | ४५,०००-६५,००० सैनिक १५४ विमाने[२] |
बळी आणि नुकसान | |
७२७ अमेरिकन आणि ५१६ ऑस्ट्रिेलियन सैनिक[३] | १८,५००-२१,५०० सैनिक ठार[४][Note १] |
बोगनव्हिल मोहीम तथा चेरी ब्लॉसम मोहीम दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे व जपानी साम्राज्यामध्ये झालेल्या लढाया होत्या. १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ दरम्यान चालू असलेली ही मोहीम कार्टव्हील मोहीम या दोस्त राष्ट्रांच्या जपानविरुद्धच्या प्रचंड मोहीमेचा भाग होती.
या मोहीमेच्या पूर्वार्धात अमेरिकन सैन्याने बोगनव्हिल द्वीपावर चढाई करून पुळणीवर ताबा मिळवला व नोव्हेंबर १९४३ ते नोव्हेंबर १९४४ तेथे ठाण मांडून ठेवले. या दरम्यान जपानी सैन्याची उपासमार आणि रोगराईमुळे मोठी खराबी झाली. उत्तरार्धात अमेरिकन सैन्य उरलेल्या जपानी सैनिकांना नामोहर करण्यासाठी बेटावर घुसले. येथे त्यांना जवळजवळ १० महिने कडवा प्रतिकार झाला.