Jump to content

बोकारो

बोकारो
ᱵᱚᱠᱟᱨᱚ
भारतामधील शहर

बोकारो रेल्वे स्थानक
बोकारो is located in झारखंड
बोकारो
बोकारो
बोकारोचे झारखंडमधील स्थान
बोकारो is located in भारत
बोकारो
बोकारो
बोकारोचे भारतमधील स्थान

गुणक: 23°40′N 86°9′E / 23.667°N 86.150°E / 23.667; 86.150

देशभारत ध्वज भारत
राज्य झारखंड
जिल्हा बोकारो जिल्हा
क्षेत्रफळ २८७ चौ. किमी (१११ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२८ फूट (२२२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,१४,८२०
  - महानगर ५,६३,४१७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बोकारो स्टील कारखाना

बोकारो स्टील सिटी (संताली: ᱵᱚᱠᱟᱨᱚ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. बोकारो शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या ११० किमी ईशान्येस व धनबादच्या ३६ किमी पश्चिमेस स्थित आहे. २०११ साली बोकारोची लोकसंख्या सुमारे ४.१४ लाख होती.

बोकारो स्टील सिटीचे नाव येथील मोठ्या स्टीलच्या कारखान्यावरून पडले आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या ५ मुख्य स्टील कारखान्यांपैकी हा एक असून त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ४.५ दशलक्ष टन इतकी आहे.

वाहतूक

बोकारो रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व रेल्वेवरील रांची-दिल्ली मार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे ६६ गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ बोकारोमधूनच धावतो व राष्ट्रीय महामार्ग ३२ बोकारोला जमशेदपूरसोबत जोडतो.

हे सुद्धा पहा

  • धनबाद (लोकसभा मतदारसंघ)