Jump to content

बोएर्नबॉन्ट

बोएर्नबॉन्ट बाउल

बोअरनबॉन्ट हा नेदरलँड्सच्या कुंभारकामांवर वापरला जाणारा पारंपारिक नमुना आहे. डचमधून भाषांतरित, "बोअर" म्हणजे शेतकरी आणि "बोंट" म्हणजे रंगांचे मिश्रण. विशिष्ट फुलांचा नमुना ज्यात लाल, पिवळा, हिरवा आणि निळा अशा रंगांचे ब्रश स्ट्रोकसह हाताने रंगविलेले चित्र असतात. सध्या बेल्जियममध्ये रॉयल बॉचद्वारे याची निर्मिती होते. या पद्धतीचा उगम १९व्या शतकात शेतकऱ्यांच्या पत्नींनी बनवलेल्या स्थानिक हस्तकलेतून झाला. रॉयल बोच वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, सुमात्रा ते गोव्या मार्गे झांझीबार पर्यंत जगभरातील डच व्यापाऱ्यांच्या मार्गे याचा प्रसार झाला.[] आजही ही एक लोकप्रिय पद्धत आहे.

हे सुद्धा पहा

  • डेल्फ्टवेअर
  • गौडा (कुंभार)

संदर्भ