बोईसर विधानसभा मतदारसंघ
बोईसर विधानसभा मतदारसंघ - १३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बोईसर मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या १. पालघर तालुक्यातील महसूल मंडळ सफाळा, बोईसर आणि मनोर ही महसूल मंडळे आणि २. वसई तालुक्यातील मांडवी महसूल मंडळ, वाळीव सीटी आणि गोखीवरे सीटी यांचा समावेश होतो. बोईसर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
बहुजन विकास आघाडीचे राजेश रघुनाथ पाटील हे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
बोईसर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजेश रघुनाथ पाटील | बहुजन विकास आघाडी | |
२०१४ | विलास सुकूर तरे | बहुजन विकास आघाडी | |
२००९ | विलास सुकूर तरे | बहुजन विकास आघाडी |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
बोईसर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विलास सुकुर तारे | बहुजन विकास आघाडी | ५३,७२७ |
सुनील पांडुरंग धनवा | शिवसेना | ४०,६४९ |
अविनाश बळीराम सुतार | मनसे | १८१०४ |
काळूराम काकड्या धोधाडे | जद (धनि) | ७३६० |
नारायण गोपाळ सवारा | अपक्ष | ३५५६ |
सुधीर शंकर नाम | अपक्ष | ३३६१ |
हरीभाऊ सोमा वर्था | अपक्ष | २५१५ |
मोहन बाबू धोडी | अपक्ष | २४५८ |
जगदीश चिंतामण ढापशी | बसपा | २१९० |
लालू धोडी माकन | अपक्ष | १८५५ |
वसंत बारक्या पारधी | अपक्ष | १३३२ |
प्रकाश भिवा सवार | अपक्ष | ८३२ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
- विलास तरे - बहुजन विकास आघाडी
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".