बॉम्बे संस्थान
मुंबई राज्य | |
---|---|
देश | भारत |
राजधानी | मुंबई |
क्षेत्रफळ | ४,९४,३५८ वर्ग किमी |
लोकसंख्या | 48,264,622 |
जिल्हे | २८ |
प्रमुख भाषा | मराठी, कन्नड, गुजराती |
स्थापना | इ.स.१९४७ |
शेवट | इ.स.१९६० |
पहिले मुख्यमंत्री | बाळासाहेब खेर |
शेवटचे मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण |
मुंबई राज्य हे इ.स.१९४७ ते इ.स.१९६० या दरम्यान अस्तित्वात असलेले भारताच्या एक घटक राज्य होते.
इतिहास
स्वातंत्रपूर्व काळात अस्तित्वात असलेला बॉम्बे प्रांताचा सिंध प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्छ आणि सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, देश, उत्तर कर्नाटक, त्याचप्रमाणे डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट्स एजन्सी, कोल्हापूर संस्थान, बडोदा संस्थान यांचे मिळून मुंबई राज्य अस्तित्वात आले.
प्रशासक
मुख्यमंत्री
मुंबई राज्यात एकूण तीन मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री | कार्यकाळ |
---|---|
बाळासाहेब गंगाधरराव खेर | इ.स.१९४७ ते इ.स.१९५२ |
मोरारजी देसाई | इ.स.१९५२ ते इ.स.१९५६ |
यशवंतराव चव्हाण | इ.स.१९५६ ते इ.स.१९६० |
गवर्नर
मुंबई राज्यात एकूण चार गवर्नर झाले.
गवर्नर | कार्यकाळ |
---|---|
राजा सर महाराज सिंह | इ.स.१९४८ ते इ.स.१९५२ |
सर गिरीजा शंकर बाजपाई | इ.स.१९५२ ते इ.स.१९५४ |
हरेकृष्ण महताब | इ.स.१९५५ ते इ.स.१९५६ |
श्री प्रकाश | इ.स.१९५६ ते इ.स.१९६२ |
जिल्हे
मुंबई राज्यात एकूण २८ जिल्हे होते.
१.अमरेली, २.बनासकांठा, ३.मेहसाना, ४.अहमदाबाद, ५.साबरकांठा, ६.खेडा, ७.पंच महल, ८.बडोदा, ९.भरूच, १०.सुरत, ११.डांग, १२.पश्चिम खानदेश (धुळे) १३.पूर्व खानदेश(जळगाव) १४.नाशिक, १५.ठाणा, १६.बृहद्मुंबई, १७.कुलाबा(रायगड), १८.रत्नागिरी, १९.पुना, २०.अहमदनगर, २१.सोलापूर, २२.उत्तर सातारा, २३. दक्षिण सातारा (सांगली), २४.कोल्हापूर, २५. विजापूर, २६.बेळगांव, २७.धारवाड, २८.उत्तर कन्नडा
राज्य पुनर्रचना नियम(इ.स.१९५६)
इ.स.१९५६ च्या राज्य पुनर्रचना नियमानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यानुसार इ.स.१९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले.
- सौराष्ट्र, कच्छ, आणि मुंबई राज्यातील गुजरात प्रदेश यांचे मिळून स्वतंत्र गुजराती भाषिकांचे गुजरात राज्य करण्यात आले.
- मुंबई राज्यातील कोकण, देश, खानदेश, आणि हैदराबाद राज्यातील मराठवाडा, मध्य प्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य करण्यात आले.
- मुंबई राज्यातील कर्नाटक प्रदेश हा म्हैसूर राज्याला जोडण्यात आला.