Jump to content

बेसन लाडू

बेसन लाडू हा एक लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे. हे लाडू बेसन (चण्याचे पीठ किंवा बेसन), साखर आणि तूप वापरून बनवलेले असतात. हे लाडू भारतातील सण, कौटुंबिक कार्यक्रम आणि धार्मिक प्रसंगी भेट दिले जातात.[]

चांदीच्या पन्नी आणि बदामाच्या चिप्सने सजवलेले बेसन लाडू.

हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टिकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.

सजवलेले बेसन लाडू
बेसन लाडू बनवण्याची पाककृती

हेदेखील पाहा

संदर्भ

  1. ^ Collingham, Lizzie (2006-02-06). Curry: A Tale of Cooks and Conquerors (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-803850-4.