Jump to content

बेळगांव

हा लेख बेळगांव शहराविषयी आहे. बेळगांव जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


बेळगाव
जिल्हाबेळगांव जिल्हा
राज्यकर्नाटक
लोकसंख्या(शहर) ३,९९,६००
(लष्कर छावणी) २३,६७८
(२००१)
क्षेत्रफळ(जिल्हा) १३,४१५ कि.मी²
दूरध्वनी संकेतांक०८३१
टपाल संकेतांक५९०----
वाहन संकेतांकKA-२२/२३/२४/४९
निर्वाचित प्रमुखउपमहापौर
(सौ. मीरा वाझ[])
प्रशासकीय प्रमुखश्री किरण. सायनाक
(महापौर)
संकेतस्थळbelgaumcity.gov.in


बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हाबेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

भूगोल

बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[] महाराष्ट्रगोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.

इतिहास

बेळगावचे स्थान

सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.

इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्रकर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

नावाचा उगम

बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[][] मराठीत बेळगावबेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.

सीमाविवाद

अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न

बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.

बेळगाव जिल्हा

बेळगाव जिल्हा

बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-

संस्कृती व लोकजीवन

२००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७]सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे.

अर्थकारण

बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८]

बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९]

शैक्षणिक संस्था

कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये.

[1]

केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी)

कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी

केएलई एमसी

[1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली.

सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम

कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे अनेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे. दक्षिण महाराष्ट्र ‍शिक्षण मंडळ ही बेळगाव ‍जिल्हा्यातील एक महत्त्वाची ‍शिक्षण संस्था

वाहतूक व्यवस्था

रस्ते

बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे.

रेल्वे

बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक)

हवाईमार्ग

बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूरमंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.

पर्यटनस्थळे

कमलबस्ती

बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१]

इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च

संदर्भ

  1. ^ "बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकला". p. 6. Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |मुद्रक= ignored (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. ^ "फॉलिंगरेन.कॉम-बेळगाव", फॉलिंगरेन.कॉम ,२८-०२-२००७, (इंग्रजी भाषेत)
  3. ^ "बेळगाव एन.आय.सी", बेळगाव एन.आय.सी
  4. ^ "सेंट्रल एक्साईज-बेळगाव", सेंट्रल एक्साईज बेळगाव
  5. ^ "बेळगावच्या नामांतरास केंद्र सरकारचा नकार", सकाळ वृत्तसमूह ,२१-०८-२००७, (मराठी भाषेत)[मृत दुवा]
  6. ^ "बंगलोर नामकरण केंद्रीय गृहमंत्रालयात अडकले", न्युइंडएक्सप्रेस ,२१-०८-२००७, (इंग्रजी भाषेत)
  7. ^ "आपल्याला आपलं काम आवडलं तर आयुष्य हे सुंदर गाणं असेल", टाइम्स ऑफ इंडिया ,०२-०३-२००७, (इंग्रजी भाषेत)
  8. ^ "हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसांचा छळ[मृत दुवा]", पुढारी ,०२-०३-२००७, (मराठी भाषेत)
  9. ^ जयशंकर जयरामय्या,"कन्नडभाषिक जाळ्यात अडकले", द फायनान्शियल एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत)
  10. ^ बेळगाव निपाणी बिदर कारवारचा सीमाप्रश्न काय आहे-बेळगाव तरुण भारत (पीडीएफ फाईल)
  11. ^ "मायमराठीच्या रक्षणासाठी मराठी ऐक्याची भक्कम फळी आवश्यक", पुढारी (मराठी भाषेत)
  12. ^ "कन्नड गुंडाचा धुडगूस सुरूच!", पुढारी (मराठी भाषेत)
  13. ^ "भारतीय जनगणनेची साठवलेली माहिती-वेबअर्काईव.कॉम", भारतीय जनगणना आयोग / वेबअर्काईव.कॉम ,०३-०३-२००७, (इंग्रजी भाषेत)
  14. ^ गिरीश कुबेर,"जिल्हा नेहमीच वादग्रस्त होता", इकॉनॉमिक टाइम्स ,२८-११-२००५, (इंग्रजी भाषेत)
  15. ^ "पापुंच्या त्या वक्तव्यावर तीव्र पडसाद: हातच्या काकणाला आरसा कशाला?[मृत दुवा]", पुढारी (मराठी भाषेत)
  16. ^ "बेळगांव-२ राज्ये व २ भाषांची कहाणी", याहू! भारत ,२४-११-२००५, (इंग्रजी भाषेत)
  17. ^ "बेळगावाचा इतिहास", वर्ल्ड६६.कॉम
  18. ^ "बेळगावातील उद्योगधंदे", बेळगाव एन.आय.सी (इंग्रजी भाषेत)
  19. ^ "बेळगाव जिल्हा", कर्नाटक.कॉम (इंग्रजी भाषेत)
  20. ^ "बेळगांव पर्यटन", बेळगांव महानगरपालिका
  21. ^ "बेळगांव एन.आय.सी पर्यटन", बेळगांव एन.आय.सी

बाह्य दुवे