बेलुरा
?बेलुरा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जिंतूर |
जिल्हा | परभणी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
बेलुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. या गावाला सेलू व मंठा या दोन तालुक्याच्या सीमा आहेत तर, जालना जिल्हा ची सीमा आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
येथील लोकजीवन हे सुरळीत असून शेती वर आधारित आहे, या गावातील बरेचसे लोक बाहेर गावी आपला उदार निर्वाह करण्यासाठी राहतात, ऊसतोड करण्याकरिता देखील या गावातील नागरिक जात असतात..
या गावात मराठा, माळी,कासार, बंजारा, बौद्ध व मातंग समाजाचे लोक गुन्या-गोविंदाने राहतात
प्रेक्षणीय स्थळे
बेलुरा या गावात बरचसे मंदिरे आहेत पण एक महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरात तीन मूर्ती असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी होत असते.
नागरी सुविधा
जवळपासची गावे
या गावाच्या पूर्व दिशेस वाडी मोहाडी आग्नेय दिशेला चारठाणा दक्षिणेस दगडचोप वाव्याय दिशेला माळकिनी बोरकिनी पश्चिम दिशेला अंभोडा कदम
नेरूत्य दिशेला सावडा नाईक तांडा, व उत्तरेस कोठा ही गावे येतात..