बेली ब्रिज
बेली ब्रिज हा लोखंडी तात्पुरता पूल होय. लोखंडासारख्या वजनी धातूचे तयार सुटे भाग (पॅनेल्स) वापरून हा पूल उभारला जातो. या पुलाचे सर्व भाग सुटे होत असल्याने गरजेनुसार पूल उभारून नंतर हलवता येतो. बेली ब्रिजचा उपयोग डोंगराळ व दुर्गम भागात सैन्य दलाला जास्त प्रमाणात होतो.[१] उदा. हावडा ब्रिज
गरज
युद्ध किंवा अन्य संकटांवेळी तातडीने पूल उभारता यावा, म्हणून या पूल उभारणीचा सराव नियमितपणे केला जातो. या पुलाच्या उभारणीसाठी जवानांच्या किमान दोन तुकड्या लागतात. एका तुकडीत दहा जवानांचा समावेश असतो. त्यासाठी ताकदवान; तसेच कुशल जवानांची गरज भासते. त्यासाठी विशिष्ट कार्यपद्धतीही निश्चित केलेली असते. प्रत्यक्ष उभारणीच्या वेळी भौगोलिक स्थितीनुसार त्यात थोडेफार बदल केले जातात. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने या पुलांचा सर्वाधिक वापर केला.[२] भारतीय लष्कर सीमावर्ती दुर्गम भागात या पुलांचा वापर करतात. अनेक ठिकाणी या पुलावरून अवजड वाहनेही नेली जातात.
संदर्भ
- ^ Unknown. "Incredible India: World's Highest Battle Field". Incredible India. 2019-12-27 रोजी पाहिले.
- ^ "Highest and longest bridges in the world". didyouknow.org (इंग्रजी भाषेत). 2019-12-27 रोजी पाहिले.