बेलीझ
बेलीझ Belize | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Sub Umbra Floreo" (लॅटिन) | |||||
राष्ट्रगीत: Land of the Free शाही राष्ट्रगीत: गॉड सेव्ह द क्वीन | |||||
बेलीझचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | बेल्मोपान | ||||
सर्वात मोठे शहर | बेलीझ सिटी | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही | ||||
- राणी | एलिझाबेथ दुसरी | ||||
- पंतप्रधान | डीन बॅरो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २१ सप्टेंबर १९८१ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २२,९६६ किमी२ (१५०वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.७ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३,४०,८४४ (१७३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २.९९९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ८,७५३ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७३२ (उच्च) (८४ वा) (२०१३) | ||||
राष्ट्रीय चलन | बेलीझ डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी−०६:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BZ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .bz | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५०१ | ||||
बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
विभाग
बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
जिल्हा | प्रशासकीय केन्द्र | क्षेत्रफळ[१] | लोकसंख्या (२०१५) |
---|---|---|---|
बेलीझ | बेलीझ सिटी | १,६६३ चौ. मैल (४,३१० चौ. किमी) | १,१०,६४४ |
कायो | सान इग्नासियो | २,००६ चौ. मैल (५,२०० चौ. किमी) | ८७,८७६ |
कोरोझाल | कोरोझाल टाउन | ७१८ चौ. मैल (१,८६० चौ. किमी) | ४५,५३० |
ऑरेंज वॉक | ऑरेंज वॉक टाउन | १,७९० चौ. मैल (४,६०० चौ. किमी) | ४९,४६६ |
स्टान क्रीक | डॅंगिरिगा | ९८६ चौ. मैल (२,५५० चौ. किमी) | ३९,६९५ |
टोलेडो | पुंता गोर्दा | १,७०४ चौ. मैल (४,४१० चौ. किमी) | ३४,९२८ |
संदर्भ
- ^ Belize Population and Housing Census 2010: Country Report (PDF) (Report). 2013. p. 70. 2016-01-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 May 2016 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (मराठी मजकूर)
- बेलीझचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील बेलीझ पर्यटन गाईड (इंग्रजी)