Jump to content

बेरिलियम

,  Be
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
- आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson


Be

गणअज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | विकिडेटामधे

(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार फार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणाऱ्या आणि दिशानिश्चिती करणाऱ्या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमपासून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ.ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड उष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.

अति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे शिवाय मॅग्नेशियम, अ‍ॅऍल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्रॉंझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्रॉंझ या मिश्र धातूच्या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्रॉंझ पासून बनविलेले असतात. या मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम-मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

बेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू, बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य, फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य, व्हेरोबायेव्हाइट आणि अ‍ॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. पैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अ‍ॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.

चित्रदालन