बेद्रिच स्मेताना
बेद्रिच स्मेताना Bedřich Smetana | |
---|---|
जन्म | २ मार्च १८२४ लितोमिस्ल, बोहेमिया, ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचा चेक प्रजासत्ताक) |
मृत्यू | १२ मे, १८८४ (वय ६०) प्राग, ऑस्ट्रिया-हंगेरी |
राष्ट्रीयत्व | चेक |
संगीत प्रकार | पियानोवादक, ऑपेरा |
स्वाक्षरी |
बेद्रिच स्मेताना (चेक: Bedřich Smetana; २ मार्च १८२४ - १२ मे १८८४) हा एक चेक संगीतकार होता. स्मेतानाला चेक संगीताचा जनक मानले जाते. त्याच्या संगीतामधून चेक जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.
१८५६ ते १८६० दरम्यान स्वीडनच्या योहतेबोर्य शहरामध्ये संगीत शिक्षकाचे काम केल्यानंतर १८६० साली स्मेताना प्रागमध्ये परतला. येथे त्याने चेक भाषेमध्ये ऑपेरा लिहिण्यास सुरुवात केली. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याने अनेक संगीतरचना केल्या.