बेथलेहेम
बेथलेहेम بيت لحم | |
पॅलेस्टाईनमधील शहर | |
बेथलेहेम | |
देश | पॅलेस्टाईन |
राज्य | वेस्ट बँक |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व १४०० |
लोकसंख्या | |
- शहर | २५,२६६ |
http://www.bethlehem-city.org/ |
बेथलेहेम हे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक प्रदेशातील एक शहर आहे. इस्रायलमधील जेरुसलेमहुन बेथलेहेम केवळ १० किमी अंतरावर आहे. बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते.
जेरुसलेमच्या दक्षिणेस जुडिया डोगरावर वसलेले हे बेंथलेहेम गाव. येथे गव्हाचे पिक फार मोठया प्रमाणात येते. जुन्या करारात या नगरीला “एफ्राता” म्हणत. जुन्या कराराच्या अगदी सुरुवातीपासून या नगरीस महत्त्वाचे स्थान मिळाले. याकोबाची लाडकी पत्नी रेचेल हिला याकोबाने येथेच पुरले. तिच्या स्मरणार्थ उभा केलेला स्तंभ आजही तेथे आहे. हिब्रू भाषेत बेंथलेहेम या शब्दाचा अर्थ होतो “भाकरीचे घर”.
मवाब देशातून आलेली नामीची विधवा सून रुथ येथील शेतात कणसे वेचीत असें. नामीच्या प्रयत्नामुळे तिचा बवाजाबरोबर पुनर्विवाह झाला. या रुथच्या वंशात दावीद राजाचा जन्म झाला. रुथ ही दावीद राजाची पणजी होय. दावीद हा बेंथलेहेमचा मेंढपाळ. गुरे राखणारा होता. पण देवाच्या आदेशानुसार शमुवेल भविष्यवाद्याने त्याला इस्राएलचा राजा होण्यासाठी तेलाने अभिषिक्त केले. त्यानुसार हाच दावीद इस्रायलचा पराक्रमी राजा बनला. याच दावीद कुळात योसेफ जन्मास आला. तो पवित्र मरीयेचा(मेरीचा) पती व प्रभू येशूचा पालक पिता होय. जणगणनेसाठी आपली नाव नोंदणी करण्यास योसेफ आपल्या या मूळ गावी आला होता. यावेळी पवित्र मरीयेचे दिवस भरले होते. अशा रीतीने या गावी पवित्र मरीयेच्या उदरी प्रभू येशूचा जन्म झाला. बेंथलेहेम गाव प्रभू येशूच्या जन्माने अजरामर झाले. या गावात ख्रिस्ती लोकवस्ती जास्त असून चर्च व मठवासीयांच्या खूप इमारती आहेत. सांजसकाळ चर्चचा घंटानाद व मठवासीयांच्या गायनाचे सूर कानी पडतात.[१]
मधील शहरे]]
[[वर्ग:पॅलेस्टाईन
- ^ इजाबेल डिसोजा. (सफर देवराज्याची).