Jump to content

बेडर

बेडर यांना कर्नाटकी आदिवाशी धेड किंवा ढेड म्हणून ओळखले जाते . विजापूरच्या पुर्वेला असणाऱ्या भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्यभागात बेडर लोकांचे राज्य होते .यांची संभावना हिंदू जातीव्यवस्थेत खालच्या आणि अस्पृश्य वर्गात होते . हे लोक अतिशय शक्तिशाली आणि कष्टकरी असतात . ऐतिहासिक दस्ताऐवजात बेरड लोक गाय, बकरे, डुक्कर , कोंबडे यांचे मांस खातात अशी नोंद आढळते . यांचा रंग सावळा, शरीरयष्टी सुगठीत, चेहरा गोल, ओठ चपटे, उंची मध्यम अशी सांगितली आहे. हे लोक कठिण जीवन जगतात . मराठा सैनिकांमध्ये पट्टीचे निशाणेबाज म्हणून बेडर लोकांची भरती होत असे . औरंगजेबाच्या कितीतरी सैनिकांना बेडर नेमबाजांनी ठार केले होते .20 जानेवारी 1696ला बसवापट्टणच्या लढाईत हिम्मतखाँ नावाच्या औरंगजेबाच्या सरदाराला बेरड जातीच्या नेमबाजांनी खुप दुरून मस्तकावर गोळी घालून ठार केले होते .मराठा सेनानायक संताजी घोरपडे यांच्या सैनिकांमध्ये अधिकांश बेडर सैनिकांची भरती होत असे. युद्धात ज्याप्रमाणे हे लोक शौर्य़ दाखवत त्याच्यामुळे समकालीन इतिहासकार यांना बेडर ( निर्भिक ) म्हणत होते . विजापुरपासून 75 किलोमीटर अंतरावर सागर या ठिकाणी बेडर लोकांची राजधानी होती . इसवी सन 1687 मध्ये मुघलांनी सागर जिंकून घेतल्यावर बेडर राजाने जवळच्या वाघिणखेडा या ठिकाणी आपली नवी राजधानी बनवली. जेव्हा हेही स्थान मुघलांनी जिंकून घेतले तेव्हा बेरड राजाने राजधानी शोरापुर येथे बनवली. पाम नायक (नाईक), पिडीया नायक(नाईक) यासारखे उल्लेखनीय बेडर राजे यांचा इतिहासात उल्लेख सापडतो. राजा पिडीया नाईक ( नायक ) याच्या सैन्यात बारा हजार बंदुकधारी निशाणेबाज होते .