बेंजामिन ब्लूमचा वर्गीकरण सिद्धांत
बेंजामिन ब्लूम ( २१ फेब्रुवारी १९१३, मृत्यू: १३ सप्टेंबर १९९९) हा एक अमेरिकन शिक्षण मानसशास्त्रज्ञ होता. ब्लूमने शिक्षणक्षेत्रात ज्ञानाच्या आकलनाबाबत वर्गीकरणविषयक सिद्धांत मांडला, तो त्याच्या नावाने Bloom's Taxonomy ओळखला जातो. या सिद्धांताला मराठीत 'ब्लूम वर्गीकरण' म्हणतात. ब्लूमने परीक्षणाची एक पद्धती शोधली. त्यासाठी त्याने The Taxonomy of Educational Objectives: The Classification of Educational Goals या नावाचे एक मोठे पुस्तक लिहिले, ते १९५६ साली प्रकाशित झाले.