बॅफिनचा उपसागर
बॅफिन (इनुक्टिटुट: Saknirutiak Imanga, फ्रेंच: Baie de Baffin) हा उत्तर अटलांटिक महासागराचा एक उपसागर आहे. तो कॅनडाच्या नुनाव्हुत प्रदेशामधील बॅफिन बेट व ग्रीनलॅंड ह्यांच्या मध्ये स्थित आहे. इंग्लिश शोधक विल्यम बॅफिन ह्याचे नाव ह्या समुद्राला दिले गेले आहे. बॅफिनचा समुद्र लाब्राडोर समुद्राद्वारे मुख्य अटलांटिक महासागरासोबत तर नारेस सामुद्रधुनीने आर्क्टिक महासागरासोबत जोडला गेला आहे.
येथील पाणी बारमाही गोठलेले असल्यामुळे बॅफिनच्या समुद्रामधून सागरी वाहतूक शक्य नाही.