बूर्गान्य
बूर्गान्य Bourgogne | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
बूर्गान्यचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | दिजॉं | ||
क्षेत्रफळ | ३१,५८२ चौ. किमी (१२,१९४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १६,३८,५८८ | ||
घनता | ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-D | ||
संकेतस्थळ | bourgogne.fr |
बूर्गान्य (फ्रेंच: Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाईन जगप्रसिद्ध आहे.
२०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
इतिहास
इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडियन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले.
विभाग
बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.
हे सुद्धा पहा
- बरगंडी
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-01-13 at the Wayback Machine.
- पर्यटन