बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन
बुलेटिन - श्रीअरविंद आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील एक म्हणजे श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनचे बुलेटिन. त्याचे पूर्ण नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे.
स्वरूप
हे बुलेटिन एकाच वेळी इंग्रजी-फ्रेंच मधून प्रकाशित होते. पूर्वी 'बुलेटिन ऑफ फिजिकल एज्युकेशन' या नावाने ते प्रकाशित होत असे. हे त्रैमासिक असून, पाँडिचेरी येथून, इ.स. १९४९ पासून प्रकाशित होत आहे.
आशय
श्रीमाताजी अतिमानस अवतरण आणि त्यासंबंधी जे आध्यात्मिक प्रयोग करत असत, त्यासंबंधी इतिवृत्तात्मक स्वरुपाची माहिती त्या या बुलेटिनद्वारे प्रसृत करत असत. [१]
निवडक अंक
- १९८८ च्या एका विशेष अंकामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या शिक्षणविषयक संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
- १९९७ च्या विशेष अंकामध्ये श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन या श्रीअरविंद आश्रमद्वारा संचालित शाळेसंबंधी परिचयवजा लेख देण्यात आला आहे. [२]
प्रारंभाविषयी
या नियतकालिकाचा प्रारंभ श्रीअरविंद यांच्या लेखनाने व्हावा, त्यासाठी त्यांनी स्वतंत्र लेख लिहावा अशी श्रीमाताजींनी त्यांना विनंती केली होती. या मासिकासाठी म्हणून श्रीअरविंद यांनी जो पहिला लेख लिहिला, त्या लेखाचे नाव होते, द डिव्हाईन बॉडी. [३]
बाह्य दुवे
नमुना अंक - एप्रिल १९६०
संदर्भ
- ^ Blessings of The Grace by Mona Sarkar
- ^ "www.sabda.in".
- ^ Twelve years with Sri Aurobindo by Nirodbaran