बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | अमरावती विभाग |
मुख्यालय | बुलढाणा |
तालुके | * खामगांव * चिखली * जळगाव जामोद * देउळगांव राजा * नांदुरा * बुलढाणा तालुका * मलकापूर * मेहकर * मोताळा * लोणार * शेगांव * संग्रामपूर * सिंदखेड राजा |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ९,६४० चौरस किमी (३,७२० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २५,८८,०३९ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २६८ प्रति चौरस किमी (६९० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८५% |
-लिंग गुणोत्तर | १.०१ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | मलकापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, सिंदखेडराजा |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ९४६ मिलीमीटर (३७.२ इंच) |
प्रमुख_शहरे | बुलडाणा, खामगाव, चिखली |
संकेतस्थळ |
बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे.[१]
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.
कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
मंदिरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे
- बुलढाणा जिल्हा संक्षिप्त माहिती:-
- शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
- लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
- जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
- नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी श्री हनुमान मूर्ती आहे.
- देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव राजास प्रति तिरुपती सुद्धा म्हणले जाते. जर कोणी एखादा नवस तिरुपती बालाजीला बोलला असेल मात्र तेथे जाऊन पूर्ण करू शकत नसेल तर तो देऊळगाव राजाच्या श्री बालाजी मंदिरात जाऊन पूर्ण करू शकतो.
- लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे.
- लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबांचे मंदिर आहे.
- बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. साकेगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
- मोताळा तालुक्यातील तारापूर येथील अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
- देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.
- सुलतानपूर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
- उंद्री या गावापासून ... कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
- अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळदेवी मंदिर आहे.
- मेहकर येथे आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकानचे श्रद्धास्थान शारंगधर बालाजी देवस्थान आहे.
- मेहकर पासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या उकळी येथे जगदंबा माता देवस्थान , श्री सिद्धेश्वर संस्थान आहे
- लोणार पासून 18 कि मी अंतरावर श्री खटकेश्वर महाराज मंदिर ब्राम्हण चिकना या ठिकाणी आहे ...
- बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर आहे.
श्री क्षेत्र थळ ता.मोताळा श्री गजाननमहाराज जन्म स्थान प्रतिष्ठान
- हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबाचा दर्गा हे पीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ ता.चिखली जिल्हा बुलढाणा येथे आहे. सैलानी बाबाच्या मार्च महिन्यातील ऐतिहासिक (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतून लाखोंच्या संख्येने हिंदू व मुस्लिम धर्मीय लोक उपस्थित राहतात. एका अंदाजानुसार सुमारे ३,००,००० च्यावर भाविक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील हजरत बाबा सैलानी सरकार यात्रेला उपस्थित राहतात.
बुलढाणा शहरापासून जवळच 18 किमी दुर असलेले दुधा येथील प्रसिद्ध मर्डदी माता मंदिर आहे हे मंदिर जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नद्या
- उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, आमना नदी
जिल्ह्यातील तालुके
- खामगांव
- चिखली
- जळगाव जामोद
- देउळगांव राजा
- नांदुरा
- बुलढाणा तालुका
- मलकापूर
- मेहकर
- मोताळा
- लोणार
- शेगांव
- संग्रामपूर
- सिंदखेड राजा
संदर्भ
बाह्य दुवे
- गजानन महाराज संस्थानाचे संकेतस्थळ Archived 2013-06-03 at the Wayback Machine.