Jump to content

बुर्ज अल अरब

बुर्ज अल अरब (अरबी: برج العرب) हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. ३२१ मीटर (१,०५० फूट) उंच असलेली बुर्ज अल अरब ही संपूर्णपणे हॉटेल म्हणुन वापरली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज अल अरब दुबईच्या जुमेराह बीचपासुन २८० मीटर अंतरावर एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आले आहे व त्याचा आकार साधारणपणे जहाजाच्या शिडासारखा आहे.

बुर्ज अल अरबचे बांधकाम १९९४ साली सुरू झाले व २००० साली ह्या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. बांधकाम पूर्ण करण्यासाठी सुमारे ६५ कोटी डॉलर्स इतका खर्च आला. बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक मानले जाते. ह्या हॉटेलमध्ये २०२ खोल्या आहेत.

बाह्य दुवे