बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट हे ग्रेटर नोएडा येथे नवी दिल्ली पासून ४० किलोमीटर दूर आहे. ८७५ एकर क्षेत्रफळावर या ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. या ट्रॅकसाठी २१५ मिलियन डॉलर खर्च करण्यात आले आहेत. या ट्रॅकचे उद्घाटन १८ ऑक्टोबर २०११ला करण्यात आले. याचे पूर्वी नाव 'जयपी इंटरनॅशनल रेसिंग सर्किट' असे होते, परंतु एप्रिल २०११ मध्ये नाव बदलून गौतम बुद्धांच्यावरून 'बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट' ठेवले गेले.
क्षमता व सुविधा
तब्बल एक ते दीड लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये शर्यती दरम्यान अपघाताचा अनर्थ उदभवल्यास वैद्यकीय सेवा तत्पर असेल. अगदी ऑपरेशन थिएटरपासून २२० जणांचे वैद्यकीय अधिकारी पथक सेवेसाठी तत्पर असेल. असं सगळं उपलब्ध आहेत व अपघात अगदीच मोठा असेल, तर अपघातातील व्यक्तींना वाहण्यासाठी दोन हेलिकॉप्टर सज्ज असतील.
रेस ट्रॅक
फॉर्म्युला वनच्या या रेस ट्रॅकचं अंतर ५.१४ किमी. आहे. ड्रायव्हर्सना ही एक लॅप पूर्ण करायला एकूण १ मिनिटे व २७ सेंकदांचा वेळ लागणार आहे. ही स्पर्धा ६० लॅपची असणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला वन कार ड्रायव्हर्सना ३६० किमीचं अंतर पार करावं लागेल. या सर्किटवर कारसाठी सर्वोच्च वेगमर्यादा ३२० किमी प्रती तास असणार आहे. या ट्रॅकवर शर्यतीदरम्यान स्पर्धकांना प्रतिस्पर्ध्यांना ‘ओव्हरटेक’ करता येईल तसेच आपल्या गाडीचा वेग वाढवता येईल या दृष्टिकोनातून रेसिंग ट्रॅक तयार केला आहे. यासाठी युरोपमधील रेसिंग ट्रॅकचे निर्माणकर्ता हर्मन टाईल्क यांच्या सल्ल्यानुसार बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटला मदत केले गेले आहे.
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी