बुद्धचरित (बुद्धचरितम्) संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. यामध्ये गौतम बुद्धांचे जीवनचरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली. काव्याच्या २८ कॅन्टोजांपैकी पहिले १४ संस्कृतमध्ये पूर्णावस्थेत अस्तित्वात आहेत (१५ ते २८ अपूर्ण अपूर्ण आहेत). इ.स. ४२० मध्ये, धर्मरक्षा यांनी याचे चिनी भाषांतर केले आणि ७व्या किंवा ८व्या शतकात एक शुद्ध स्वरूपाची तिबेटी आवृत्ती तयार करण्यात आली जी "चिनीपेक्षा मूळ संस्कृतच्या अगदी जवळ असल्याचे दिसते". भाऊ लोखंडे यांनी बुद्धचरिताचा मराठी अनुवाद व संपादन केले आहे.