Jump to content

बी. जयश्री

बी. जयश्री (९ जून, १९५०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) या भारतीय चित्रपट तसेच नाट्यअभिनेत्री, दिग्दर्शिका आणि गायिका आहेत. त्यांनी नागमंडल, देवीरी आणि केर ऑफ फूटपाथ सह अनेक चित्रपटांतून अभिनय केला.

जयश्री या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ च्या स्नातिका आहेत. यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे तसेच २०१६मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. या कन्नड नाट्यदिग्दर्शक गुब्बी वीरण्णा यांची नात होय.