Jump to content

बी.ए.एस.एफ.

बी.ए.एस.एफ. ही जर्मनीतील आघाडीची रसायने बनवणारी कंपनी असून जगातील सर्वात मोठया कंपनीच्या यादीत तिचा समावेश होतो. कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र जर्मनी मध्ये मानहाइम शहराजवळ लुडविग्सहाफेन येथे आहे. कंपनीचे जगभर १०० च्या पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादन केंद्रे असून ८१ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची स्थापना १८६५ मध्ये झाली. सुरुवातिला कपडे रंगवण्यास लागणारे रंग बनवणारी ह्या कंपनीने काळानुरूप अनेक रासायनिक प्रक्रिया विकसित केल्या. आज कंपनीचे उत्पादन मुख्यत्वे रसायने, विविध प्रकारचे प्लास्टिक व पॉलिमर, रासायनिक खते, खास रसायने व पेट्रोलियम व नैसर्गिक वायु उत्पादने यात आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न २००६ मध्ये ४ हजार कोटि युरो ( २ लाख २०हजार कोटि रुपये) इतके होते.

बी.ए.एस.एफ. कंपनीचा लोगो