Jump to content

बीसीजी लस

क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) लस (bacille Calmette-Guerin) ही लस प्रामुख्याने क्षयरोगासाठी (टीबी)साठी वापरली जाते.[] ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सार्वत्रिक आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते.[] क्षयरोग सार्वत्रिक नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषतः लसीकरण केले जाते, तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरीत्या तपासणी आणि उपचार केले जातात. ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते.[] बीसीजीची बुरुली अल्सर संसर्ग आणि इतर नॉनट्यूबरक्युलस मायकोबॅक्टेरिया संसर्ग याविरूद्धदेखील थोडी परिणामकारकता आहे. याव्यतिरिक्त ती काहीवेळा मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचाराचा भाग म्हणून वापरली जाते.[]

क्षयरोगाच्या संसर्गापासून बचावाचे दर मोठ्या प्रमाणात बदलतात आणि बचाव वीस वर्षापर्यंत टिकू शकतो.[] सुमारे 20% मुलांमध्ये ही संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते आणि ज्यांना संसर्ग होतो त्यांच्यापैकी अर्ध्या जणांचा रोग विकसित होण्यापासून बचाव करते.[] लस त्वचेत इंजेक्शनद्वारे दिली जाते. अतिरिक्त डोसना कोणत्याही पुराव्यांचा आधार नाही.[]

गंभीर आनुषंगिक परिणाम दुर्मिळ आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी बऱ्याचदा लालसरपणा, सूज आणि सौम्य वेदना होते. बरे झाल्यानंतर एखाद्या जखमेसह एखादा छोटा व्रण देखील तयार होऊ शकतो. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांमध्ये आनुषंगिक परिणाम अधिक सामान्य आणि संभाव्यतः अधिक तीव्र असतात. गर्भधारणेदरम्यान ही लस वापरण्यास सुरक्षित नाही. ही लस मूलतः मायकोबक्टेरियम बोव्हिस पासून विकसित केली गेली होती जे सामान्यतः गायींमध्ये आढळते. जरी ते कमकुवत झाले असले, तरीही ते अद्याप जिवंत आहे.[]

बीसीजी लस प्रथम सन १९२१मध्ये वैद्यकीय पद्धतीने वापरली गेली.[] बीसीगी ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य प्रणालीमध्ये आवश्यक असलेले सर्वात अत्यावश्यक, प्रभावी आणि सुरक्षित औषधांच्या यादीमध्ये आहे, [] 2011 ते 2014 या काळात विकसनशील जगामध्ये याची घाऊक किंमत ही प्रत्येक डोसाला 0.16 ते 1.11 अमेरिकन डॉलर इतकी होती.[] अमेरिकेमध्ये याची किंमत 100 ते 200 अमेरिकन डॉलर इतकी आहे. 2004 पर्यंत जगभरात सुमारे 100 दशलक्ष मुलांना दरवर्षी ही लस दिली जाते.[]

संदर्भ

  1. ^ a b c d e f "BCG Vaccine: WHO position paper" (PDF). Weekly epidemiological record. 4 (79): 25-40. Jan 23, 2014.
  2. ^ "Revised BCG vaccination guidelines for infants at risk for HIV infection" (PDF). Wkly Epidemiol Rec. 82 (21): 193-196. May 25, 2007. PMID 17526121.
  3. ^ Roy, A; Eisenhut, M; Harris, RJ; Rodrigues, LC; Sridhar, S; Habermann, S; Snell, L; Mangtani, P; Adetifa, I; Lalvani, A; Abubakar, I (5 August 2014). "Effect of BCG vaccination against Mycobacterium tuberculosis infection in children: systematic review and meta-analysis". BMJ (Clinical research ed.). 349: g4643. PMID 25097193.
  4. ^ Houghton, BB; Chalasani, V; Hayne, D; Grimison, P; Brown, CS; Patel, MI; Davis, ID; Stockler, MR (May 2013). "Intravesical chemotherapy plus bacille Calmette-Guérin in non-muscle invasive bladder cancer: a systematic review with meta-analysis". BJU International. 111 (6): 977–83. PMID 23253618.
  5. ^ "WHO Model List of EssentialMedicines" (PDF). World Health Organization. October 2013. Retrieved 22 April 2014.
  6. ^ "Vaccine, Bcg[permanent dead link]". International Drug Price Indicator Guide. Retrieved 6 December 2015.
  7. ^ Hamilton, Richart (2015). Tarascon Pocket Pharmacopoeia 2015 Deluxe Lab-Coat Edition. Jones & Bartlett Learning. p. 312. ISBN 9781284057560.