बीजापूर जिल्हा
विजापूर जिल्हा याच्याशी गल्लत करू नका.
बीजापूर जिल्हा | |
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा | |
छत्तीसगढ मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | छत्तीसगढ |
मुख्यालय | बीजापूर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ६,५६२.५ चौरस किमी (२,५३३.८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २,५५,२३० (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३९ प्रति चौरस किमी (१०० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ४०.९०% |
-लिंग गुणोत्तर | ९८४ ♂/♀ |
बीजापूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस महाराष्ट्र राज्याचा गडचिरोली जिल्हा तर नैऋत्येस तेलंगणा राज्य आहेत. बीजापूर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २००७ साली हा जिल्हा दांतेवाडा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. साक्षरतेच्या बाबतीत बीजापूर जिल्ह्याचा देशात खालून दुसरा क्रमांक लागतो. येथील केवळ ४०.९ टक्के जनता साक्षर आहे.