बिहार विधानसभा निवडणूक, २०१५
|
२०१० ←
| १२ ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर २०१५ | → २०२०
|
|
|
|
बिहार |
बिहार विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या बिहार राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१५ दरम्यान ५ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये बिहार विधानसभेमधील सर्व २४३ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.
२०१४ लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षला अभुतपूर्व यश मिळाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी बिहारमध्ये भाजपची विजयी घोडदौड थांबवण्याचा निश्चय केला. एप्रिल २०१५ मध्ये समाजवादी पक्ष, जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भारतीय राष्ट्रीय लोक दल व समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ह्या सहा राजकीय पक्षांनी जनता परिवाराची घोषणा केली व मुख्यमंत्री नितीश कुमार ह्यांना आपला नेता निवडले. नंतर जनता परिवारात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष देखील सामील झाले. ह्यामुळे देशातील सर्व प्रमुख पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत बिहारमध्ये पाहण्यास मिळाली. ह्या आघाडीने १६८ जागांवर विजय मिळवून सहजच बहुमत प्राप्त केले. लालू प्रसाद यादव ह्यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ८० जागांवर विजय मिळाला परंतु निवडणुकीपूर्वी झालेल्या करारानुसार नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदावर राहिले.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे