बिली बॉब थॉर्न्टन
बिली बॉब थॉर्न्टन (४ ऑगस्ट, १९५५:हॉट स्प्रिंग्ज, आर्कान्सा, अमेरिका - ) हा अमेरिकन अबिनेता, लेख, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. याने स्लिंग ब्लेड, द अपॉसल, पुशिंग टिन, आर्मागेडन, प्रायमरी कल्रर्स, मॉन्स्टर्स बॉल, बॅड सँटा, द अलामो यांसह अनेक चित्रपटांतून काम केले आहे.
थॉर्न्टनला स्लिंग ब्लेड चित्रपटासाठी पटकथालेखनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते
थॉर्न्टनने सहा वेळा लग्न केले आहे व त्याला तीन बायकांपासून चार मुले आहेत. त्याच्या भूतपूर्व पत्नींपैकी अँजेलिना जोली एक आहे.