Jump to content

बिथिनिया व पाँटस

इ.स. १२५ च्या वेळचा बिथिनिया व पॉंटस प्रांत

बिथिनिया व पॉंटस (लॅटिन: Provincia Bithynia et Pontus, ग्रीक: Επαρχία Βιθυνίας και Πόντου) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. अनातोलिया (आजचा तुर्कस्तान) या प्रदेशाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या भागावर हा प्रांत होता. इ.स.पू. ७४ व इ.स.पू. ६३ या वर्षांमध्ये जिंकून घेतलेल्या बिथिनिया व पॉंटस या राजतंत्रांच्या एकत्रीकरणातून हा प्रांत निर्माण झाला होता.