Jump to content

बिटरगाव

करमाळा तालुक्यात एकूण दोन बिटरगाव आहेत त्यापैकी बिटरगाव श्री हे करमाळ्याच्या उत्तरेला आहे तर बिटरगाव वांगी हे करमाळ्याच्या दक्षिणेला आहे हे पुनर्वसित आहे 1972सालाला हे उजनी डॅम मध्ये गेले बिटरगावला फार मोठा प्राचीन धार्मिक इतिहास आहे धाराशिवचे राजे यमाजी राजे निंबाळकर यांचे नातू रघुजी राजे निंबाळकर यांनी निजामशाही मधून सरसेनापती पदाचा त्याग करून भीमा नदीच्या तीरावरील बिटरगाव येथे वास्तव्य केले त्याच ठिकाणी त्यांची संजीवनी समाधी आहे बिटरगावला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा बिटरगावच्या काल्याला येतो अशी आख्यायिका आहे हजारो भाविक भक्त या आषाढीच्या काल्याला उपस्थित असतात वर्षभर या ठिकाणी संतांच्या पुण्यतिथि देवाच्या जयंती असे अनेक उत्सव संपन्न होत असतात बिटरगाव वरून माघ महिना मध्ये हजारो भाविक भक्त श्री संत रघुराज महाराज माघ वारी पायी दिंडी सोहळा घेऊन पंढरपूरला जातात वैशाख वद्य नवमीला श्री संत रघुराज महाराजांनी संजीवनी समाधी घेतली त्याचाही फार मोठा उत्सव याठिकाणी संपन्न होत असतो श्री संत स्वामी रघुराज महाराजांची ही वैभवशाली परंपरा श्री संत रघुराज महाराजांचे नववे वंशज ह भ प गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर हे चालवत आहेत