बिग बॉस (हंगाम १४)
बिग बॉस १४ | |
---|---|
निर्मिती संस्था | एन्डेमॉल शाइन इंडिया |
सूत्रधार | सलमान खान |
आवाज | अतुल कपूर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
एपिसोड संख्या | १४१ |
निर्मिती माहिती | |
स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
प्रसारणाची वेळ | दररोज रात्री १०.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | कलर्स टीव्ही |
प्रथम प्रसारण | ३ ऑक्टोबर २०२० – २१ फेब्रुवारी २०२१ |
अधिक माहिती | |
आधी | बिग बॉस (हंगाम १३) |
नंतर | बिग बॉस ओटीटी |
सारखे कार्यक्रम | बिग बॉस |
बिग बॉस १४, ज्याला बिग बॉस: "अब सीन पलटेगा" असेही म्हणले जाते, हा भारतीय रिॲलिटी टीव्ही मालिका बिग बॉसचा चौदावा सीझन आहे. त्याचा प्रीमियर ३ ऑक्टोबर २०२० रोजी कलर्स टीव्हीवर झाला. सलमान खान अकराव्यांदा बिग बॉस होस्ट करत आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले २१ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये रुबिना दिलैक विजेती आणि राहुल वैद्य प्रथम उपविजेता ठरला.
घरच्यांची स्थिती
क्र | सदस्य | प्रवेश | बाहेर | स्थिती |
---|---|---|---|---|
१ | रुबिना | दिवस १ | दिवस १४१ | विजेती |
२ | राहुल | दिवस १ | दिवस ६४ | सोडले |
दिवस ७४ | दिवस १४१ | उपविजेता | ||
३ | निक्की | दिवस १ | दिवस १४१ | बाहेर पडले |
दिवस ७० | दिवस १४१ | तिसरे स्थान | ||
४ | अली | दिवस ३१ | दिवस ६० | बाहेर पडले |
दिवस ७० | दिवस १४१ | चौथे स्थान | ||
५ | राखी | दिवस ७० | दिवस १४१ | सोडले |
६ | देवोलिना | दिवस १०६ | दिवस १३४ | बाहेर पडले |
७ | अभिनव | दिवस १ | दिवस १३० | सपोर्टर्स ने काढले |
८ | अर्शी | दिवस ६६ | दिवस १२७ | बाहेर पडले |
९ | विकास | दिवस ६५ | दिवस ७२ | काढून टाकले |
दिवस ८० | दिवस १०२ | सोडले | ||
दिवस १०८ | दिवस १२० | बाहेर पडले | ||
१० | सोनाली | दिवस ८१ | दिवस ११३ | बाहेर पडले |
११ | एजाज | दिवस १ | दिवस १०६ | सोडले |
१२ | जास्मीन | दिवस १ | दिवस ९९ | बाहेर पडले |
१३ | राहुल म. | दिवस ६६ | दिवस ९३ | बाहेर पडले |
१४ | मनु | दिवस ६६ | दिवस ८० | सोडले |
१५ | कश्मिरा | दिवस ६५ | दिवस ७८ | बाहेर पडले |
१६ | कविता | दिवस २२ | दिवस ३१ | बाहेर पडले |
दिवस ३६ | दिवस ६१ | सोडले | ||
१७ | पवित्रा | दिवस १ | दिवस ५७ | बाहेर पडले |
१८ | जान | दिवस १ | दिवस ५० | बाहेर पडले |
१९ | शार्दूल | दिवस २२ | दिवस ४३ | बाहेर पडले |
२० | नयना | दिवस २२ | दिवस ३६ | बाहेर पडले |
२१ | निशांत | दिवस १ | दिवस ३१ | घरच्यांनी काढले |
२२ | शहजाद | दिवस १ | दिवस १८ | सिनियर्स ने काढले |
२३ | सारा | दिवस १ | दिवस ९ | सिनियर्स ने काढले |
स्पर्धक
सिनियर्स
वर्णक्रमानुसार वरिष्ठ:
- गौहर खान – अभिनेत्री आणि मॉडेल, बिग बॉस (हंगाम ७)ची विजेती.
- हीना खान – अभिनेत्री आणि मॉडेल, बिग बॉस (हंगाम ११)ची उपविजेती.
- सिद्धार्थ शुक्ला – अभिनेता, मॉडेल आणि होस्ट, बिग बॉस (हंगाम १३)चा विजेता.
मूळ प्रवेश
- एजाज खान - दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेता. काव्यंजली मधील काव्यच्या भूमिकेसाठी तो स्मरणात आहे, आणि कहीं ते होगा, क्या होगा निम्मो का, ये मोह मोह के धागे आणि पुनर विवाह - एक नई उमेद यासह इतर कार्यक्रमांमध्ये देखील दिसला होता.
- निक्की तांबोळी – चित्रपट अभिनेत्री. तिने प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगात काम केले, ज्यात कंचना ३, थिप्पारा मीसम आणि चिकाटी गाडिलो चिथाकोतुडू सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
- अभिनव शुक्ला - मॉडेल आणि अभिनेता. दिया और बाती हम, गीत - हुई सबसे परायी आणि सिलसिला बदलते रिश्तों का यांसारख्या मालिकांचा तो भाग होता.
- रुबिना दिलैक – दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेत्री. छोटी बहू मध्ये राधिका पुरोहित आणि शक्ती - अस्तित्व के एहसास की मध्ये सौम्या सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते.
- जास्मिन भसीन – दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेत्री. ती टशन-ए-इश्क मधील ट्विंकल तनेजा सरना आणि दिल से दिल तक मधील टेनी भानुशाली या भूमिकेसाठी ओळखली जाते, त्याशिवाय ती फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी ९ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी - मेड इन इंडिया मधील स्पर्धक म्हणून ओळखली जाते.
- निशांत सिंग मलकानी – मॉडेल आणि अभिनेता. तो प्रीत से बंधी ये दोरी राम मिलायी जोडी मधील अनुकल्प गांधी आणि गुड्डन तुमसेना हो पायेगा मधील अक्षत जिंदालच्या भूमिकेसाठी ओळखला जातो आणि हॉरर स्टोरी (चित्रपट), बेझुबान इश्क या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
- शेहजाद देओल - मॉडेल. २०१८ मध्ये एम. टीव्ही. एस ऑफ स्पेसच्या पहिल्या सीझनमध्ये तो तिसरा उपविजेता होता.
- सारा गुरपाल - गायिका आणि अभिनेत्री. रणजित बावा यांनी गायलेल्या जीन या गाण्यात दिसल्यानंतर ती लोकप्रिय झाली आणि तिने मंजे बिस्त्रे आणि डांगर डॉक्टर जेली या चित्रपटांमध्येही काम केले.
- जान कुमार सानू - संगीतकार/गायक. तो बॉलिवूड गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे.
- पवित्रा पुनिया - दूरचि्रवाणी अभिनेत्री. लव्ह यू जिंदगी मधील गीत आणि ये है मोहब्बतें मधील निधी या भूमिकेसाठी ओळखली जाणारी, तिने स्प्लिट्सविला ३ मध्ये भाग घेतला आणि कवच... काली शक्ती से, नागिन ३, दायन आणि बालवीर रिटर्न्स सारख्या इतर अनेक मालिकांमध्ये दिसली.
- राहुल वैद्य - गायक. इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा तो दुसरा उपविजेता होता आणि जो जीता वही सुपरस्टार या स्टार प्लसवरील रिॲलिटी सिंगिंग शोचा विजेता होता. त्याने शादी नंबर १, जान-ए-मन आणि क्रेझी ४ सारख्या चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली.
वाइल्ड कार्ड प्रवेश
- कविता कौशिक – अभिनेत्री, दूरचित्रवाणी होस्ट आणि मॉडेल. कविता F.I.R मध्ये चंद्रमुखी चौटाला आणि डॉ. भानुमती ऑन ड्युटीसाठी ओळखली जाते.
- नयना सिंग - दूरचि्रवाणी अभिनेत्री आणि मॉडेल. नैना स्प्लिट्सविला १०ची विजेती आहे, भारताच्या नेक्स्ट सुपरस्टारमध्ये उपविजेती आहे आणि कुमकुम भाग्य मध्ये "रिया"ची भूमिका साकारण्यासाठी देखील ओळखली जाते.
- शार्दुल पंडित – दूरचित्रवाणी अभिनेता, रेडिओ मिर्चसाठी रेडिओ जॉकी. रेडिओ मिर्चीमध्ये रेडिओ जॉकी म्हणून ओळखले जाते. तो कुलदीपक या शोमध्ये दिसला होता.
- अली गोनी - दूरदर्शन अभिनेता. 'ये हैं मोहब्बते' मधील रोमेश "रोमी" भल्लाच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. तो फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी ९ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी मेड इन इंडियामध्ये स्पर्धक होता.
- सोनाली फोगाट – राजकारणी, अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार. ती पंजाबी आणि हरियाणवी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली आहे.
चॅलेंजर्स
- विकास गुप्ता - निर्माता. बिग बॉस (हंगाम ११)चा स्पर्धक.
- राखी सावंत – अभिनेत्री आणि नृत्यांगना. बिग बॉस (हंगाम १)ची स्पर्धक.
- कश्मीरा शाह - माजी बॉलीवुड अभिनेत्री आणि रिॲलिटी दूरचित्रवाणी स्टार. बिग बॉस (हंगाम १)ची स्पर्धक.
- राहुल महाजन - राजकीय नेता. बिग बॉस (हंगाम २) आणि हल्ला बोलचा स्पर्धक.
- अर्शी खान - मॉडेल, अभिनेत्री आणि नृत्यांगना. बिग बॉस (हंगाम ११)ची स्पर्धक.
- मनु पंजाबी - रिॲलिटी टीव्ही व्यक्तिमत्त्व. बिग बॉस (हंगाम १०)चा स्पर्धक.
अतिथी प्रवेश
- देवोलीना भट्टाचार्जी – दूरचि्रवाणी अभिनेत्री. ती बिग बॉस (हंगाम १३) मध्ये स्पर्धक होती. ती एजाज खान साठी प्रॉक्सी म्हणून दिसली, जो काही आठवड्यांसाठी आधीच्या वचनबद्धतेमुळे घर सोडली.