बिंबिका
बिंबिका रक्ताचा घटक आहे. यास इंग्लिशमध्ये प्लेटलेट्स (Platelets) किंवा थ्रोम्बोसाईट्स (Thrombocytes) म्हणतात. बिंबिकांचे प्रमुख कार्य रक्त गोठणे आहे. ज्या ठिकाणाहून रक्त रक्तवाहिन्यांच्या बाहेर पडते तिथे फायब्रिन नावाचे प्रथिने जाळी तयार करतात. त्या जाळीत बिंबिका अडल्यामुळे रक्त बाहेर पडणे थांबते. त्यांचा आकार २-३ मायक्रोमीटर असतो.
रक्तातील प्रमाण
१,५०,००० ते ४,५०,००० पेशी प्रति मिली रक्त