बा.भो. शास्त्री
बा.भो. शास्त्री | |
मूळ नाव | भिकाजी रंगनाथ डाके |
जन्म | १९५२ मांजरगाव |
संप्रदाय | महानुभाव संप्रदाय |
भाषा | मराठी |
साहित्यरचना | झांजर,मार्गस्थ(आत्मचरित्र) |
कार्य | लेखक, समाजप्रबोधन |
संबंधित तीर्थक्षेत्रे | श्री दत्तगढ, वरझडी |
व्यवसाय | प्रवचनकार, कीर्तनकार |
वडील | रंगनाथ पांडुरंग डाके |
आई | भागुबाई रंगनाथ डाके |
बाभुळगावकर भोजराज शास्त्री उर्फ बा.भो. शास्त्री हे मराठी कवी, लेखक आणि महानुभाव पंथातील प्रवचनकार महंत आहेत.
शास्त्री यांचा जन्म सन १९५२ मध्ये मु.पो. मांजरगाव ता.बदनापुर जि.जालना येथे सौ भागुबाई व श्री रंगनाथ पांडुरंग डाके यांच्या पोटी एका वारकरी कुटुंबात झाला, त्यांचे नाव भिकाजी असे ठेवण्यात आले.[ संदर्भ हवा ] वडीलांच गावातच छोटंसं हॉटेल,आई बद्दल बाबांना देखील आठवत नाही कारण जन्मानंतर काही महिन्यात त्यांचे निधन झाले.आईच्या प्रेमाला मुकलेल्या व वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सरभर झालेले जीवन यशोदा माई बनुन सावरलं ते त्यांच्या आत्यांनी. आपली आई आणि वडील कोण आहेत हे बाबाला माहिती नव्हतं;बाबा आत्याला च जन्मदात्री समजुन आई म्ह्णून हाक मारत.[ संदर्भ हवा ] बाबांचे बालपण डोंगरगाव ता.बदनापुर जि.जालना येथे आत्याच्या घरी गेले. बालपण गुर-ढोर सांभाळन्यात डोंगरदऱ्या मध्ये फिरण्यात एका सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलाप्रमाणे गेले. तेथे शिक्षणाचा गंध लागेल असं वातावरण देखील बाबांना लाभलं नाही म्हणुन औपचारिक असं शालेय शिक्षण झालेले नाही.[ संदर्भ हवा ]
शैक्षणिक वाटचाल -
१९६९ साली वयाच्या १७ व्या वर्षी महानुभाव आश्रम बदनापुर येथे बाबाना अक्षरांची ओळख झाली.[ संदर्भ हवा ]
१९७४ साली फैजपूर जि.जळगाव येथील श्री चक्रधर संस्कृत महाविद्यालयात येथे संस्कृत अध्ययनासाठी प्रवेश[ संदर्भ हवा ]
१९७८ साली नागपूर विद्यापीठाची शास्त्री परीक्षा उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ]
वारकरी ते पंथीय -
वारकरी पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म यामुळे साहजिकच वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायांचा प्रभाव त्यांच्यावर आहे.[ संदर्भ हवा ] बाबा अनेक प्रागतिक विचार, काळाबरोबर बदल स्वीकारण्याची त्यांची वृत्ती बाबा जपताना दिसतात. आपल्या वाटचालीत महानुभाव व वारकरी संप्रदायांमध्ये झालेल्या विचारसंघर्षांची नोंदही येते. ‘माझं माहेर वारकरी व सासर महानुभाव आहे. माहेर व सासरच्या संघर्षांत सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली होती,’ अशी जाहीर कबुली बाबा देत असतात.[ संदर्भ हवा ] वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने महानुभाव आणि वारकरी संप्रदाय यांची समन्वयाची भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसुन येते. पंथात कीर्तनपरंपरा रुळवण्याचा प्रयत्न शास्त्रीजींनी केला. महाचिंतनी सारख्या सर्वसमावेशकयंत्रणेचे जनक म्हणुन बाबा सर्वश्रुत आहेत.[ संदर्भ हवा ]
चिंतनीजनक बा. भो. शास्त्री -
चिंतनी च्या व्यासपीठावरून सर्वधर्म-पंथ-जात एकच आहेत ही शिकवण दिली जाते.या ३ दिवसीय महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक, साहित्यिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण केले जाते. दरवर्षी जानेवारी मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो च्या संख्येने लोक उपस्थित असतात[ संदर्भ हवा ]
पुरस्कार -
- बाबांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यात हरी नारायण आपटे हा वाङ्ममय पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०२३ या वर्षासाठीचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते आळंदी येथे देण्यात आला.[ संदर्भ हवा ]
बाबांची ग्रंथसंपदा -
- बा. भो. शास्त्री यांची साहित्य संपदा बद्दल सांगायचे झाल्यास सुमारे ४० हुन अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत."झांजर" या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे हा वाङ्ममय पुरस्कार प्राप्त झाला आहे.[ संदर्भ हवा ]
- 'निश्चल डोंगरगाव प्रेमळ माणसं हा गद्यपाठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.[ संदर्भ हवा ]
- ‘मार्गस्थ हे बाबांचे आत्मचरित्र आहे अतिशय नितळ, पारदर्शी; पण तितकेच परखड व खडतर प्रवास उलगडणारे हे लेखन आहे,एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून कळतं.कुठलाही बडेजाव न करता अनेक गुपिते बाबांनी उलगडलेली आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रमुख कार्यक्रम-
राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती द्वारा आयोजित दुसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्ष
प्रकाशित साहित्य[ संदर्भ हवा ]
- मार्गस्थ भाग १ आणि भाग २ (आत्मकथा)
- झांजर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कादंबरी)
- आम्हीबी घडलो तुम्हीबी घडाना
- झोळी (काव्यसंग्रह)
- प्रायश्चित्त (काव्य)
- लीळा वैभव भाग १ व भाग २ (लीळा चरित्र आधारित काव्य)
- महावाक्य
- ओथंबा
- गोत्रज
- एक सूर्य एक प्रभा
- देव माणूस
- श्री गोविंदप्रभू
- सभाशास्त्र
- भिका म्हणे
- अभंग चिंतनी
- कीर्तन सांगाती
- कीर्तन चंद्रिका
- कीर्तन गंगा
- प्रसाद सेवा
- नामाचे दहा ठाय
- मार्गरूढी
पुरस्कार
- झांजर (कादंबरी) : हरी नारायण आपटे पुरस्कार(महाराष्ट्र राज्य सरकार)[ संदर्भ हवा ]
- ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार (2023)सांस्कृतिक विभाग (महाराष्ट्र शासन)[१][२]
संदर्भ
- ^ "राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर". Rangmaitra (इंग्रजी भाषेत). 2019-01-18 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-12 रोजी पाहिले.