बावखळ
बावखळ म्हणजे खळ्यासारखी बाव.खळे म्हणजे उथळ पसरट भाग. बाव म्हणजे विहीर. पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो ह्या बावखळात आपोआप साठला जातो. बावखळ पसरट असल्याने त्यामध्ये आजूबाजूचे पावसाचे पडलेले पाणी सहजरित्या जमा होते. पावसाळ्यानंतर बागायती साठी हेच पाणी उपयोगी पडते. पूर्वी बावखळावर लाकडी रहाट असे. हल्ली बरीच बावखळे बुजवून टाकली आहेत आणि बागायती सुद्धा कमी झाली आहे. वसई तालुक्यात साधारणपणे ३००० बावखळे आहेत. हल्ली काही स्थानिक नवतरुण पर्यावरणप्रेमी लोकांनी बुजवलेली बावखळे साफ करून त्यामध्ये पुन्हा पाणी साठवायला सुरुवात केलेली आहे.वसईतील ध्यास फाऊंडेशन बावखलांचे संवर्धन करीत आहे.बावखल संशोधक सचिन मर्ती आणि त्यांच्या टीमतर्फे बावखलांचे संवर्धन केले जाते.[१]
संदर्भ
मुंबई टाईम्स २९/०५/२०२०.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक २ जून २०२४