Jump to content

बाळासाहेब सावंत

बाळासाहेब सावंत

कार्यकाळ
२४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ – ०५ डिसेंबर, इ.स. १९६३
राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित
मागील मारोतराव कन्नमवार
पुढील वसंतराव नाईक

मृत्यू २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस
पत्नी वनमाला
अपत्ये
निवास रत्नागिरी
गुरुकुल कोकण कृषी विद्यापीठ
व्यवसाय वकिली
धर्म हिंदु

परशुराम कृष्णाजी उपाख्य बाळासाहेब सावंत हे २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी केवळ तेरा दिवस राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.[]

इ.स. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुर्ले मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.

मराठी चित्रपटांत आणि नाटकांत कामे करणाऱ्या अभिनेत्री वनमाला या पी.के. सावंत यांच्या पत्नी होत्या.

ई.स. २००१ मध्ये त्यांच्या स्मृतीचा आदर म्हणून कोकण कृषी विद्यापीठाला डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नांव जोडून नामविस्तार केला गेला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महाराष्ट्र में 50 साल में 15 नेता बने मुख्यमंत्री" (हिंदी भाषेत). २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.