बाल्टिक समुद्र
बाल्टिक समुद्र हा उत्तर युरोपामधील एक समुद्र आहे. बाल्टिक समुद्र १,६०० किमी लांब व सरासरी १६६ किमी रूंद असून त्याचा साधारण ४५% भाग गोठलेल्या स्थितीत असतो. ह्या समुद्राचे पाणी इतर समुद्रांच्या पाण्यापेक्षा कमी खारट परंतु गोड्या पाण्यापेक्षा अधिक खारट आहे. या समुद्राची क्षारता ७°/॰॰ एवढी आहे.*
डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, लात्व्हिया, जर्मनी, लिथुएनिया, पोलंड, रशिया व स्वीडन हे देश बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यांवर आहेत.
- संदर्भ इ. ९ वीचे भूगोलाचे पुस्तक SCERT बालभारती, प्रकरण ६वे सागरजलाचे गुणधर्म.