Jump to content

बार्शी

  ?बार्शी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: भगवंत नगरी
—  तालुका  —
Map

१८° १४′ ०३″ N, ७५° ४१′ ४२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३५६ मी
लोकसंख्या३,००,००० (2017)
भाषामराठी
संसदीय मतदारसंघउस्मानाबाद
तहसील
पंचायत समितीबार्शी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४१३४०१,११,२,१०
• +०२१८४
• महाराष्ट्र १३(MH13)
बार्शी is located in भारत
बार्शी
बार्शी
बार्शी (भारत)

बार्शी' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हणले जाते. येथील वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन, उत्तरेश्वर फाऊंडेशन व उड़ान फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे . बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. बार्शी हे शहर कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय,औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.

बार्शीची नाट्य परंपरा ही सुद्धा अत्यंत जुनी आहे. अनेक टी.व्ही सिरिअल आणि चित्रपटामध्यही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शीमध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. बार्शीमध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते.तसेच ईथे "उत्तरेश्वराचे" देखील मोठे मंदिर आहे त्यास बार्शीचा मोठा "महादेव" म्हणतात तसेच बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात...

वन्यजीव

बार्शीच्या निसर्गात वैविध्यता आढळते. बार्शीच्या पश्चिम भागात गवताळ प्रदेश आणि माळरान आहे तर पूर्वेस थोड्याफार प्रमाणात नैसर्गिक जंगल आहे. पावसाळ्यात जुलै महिन्यात पानगाव येथील झोटिंग बाबा मंदिर परिसरातील टेकड्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातात. पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे असल्यामुळे हिवाळा चालू झाला की गवत सुकून जायला सुरुवात होते. बार्शीत पाणथळ क्षेत्र, गवताळ प्रदेश, माळरान आणि जंगल यांचे मिश्रण असल्यामुळे येथे जैवविविधता चांगल्या प्रमाणात दिसत होती. पण घटत्या आधिवासामुळे बरेच पशुपक्षी कमी झालेले असल्याचे अभ्यासकांना लक्षात आलेले आहेत. त्यामुळे धाविक पक्षी, शृंगी घुबड, ब्रह्मिनी घर, हरियाल पक्षी, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर पशू पक्ष्यांच्या दिसण्याचे प्रमाण फार कमी झालेले आहे हे लक्षात येते.

शैक्षणिक सुविधा

  • बार्शी हे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.
  • अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी बार्शीत 'भगवंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी' ही संस्था आहे. तर पदविका अभ्यासक्रमासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक' ही संस्था आहे.
  • वैद्यकीय शिक्षणासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग' हे महाविद्यालय बी. एस्सी. नर्सिंग हा अभ्यासक्रम चालवते.
  • औषधनिर्माण शास्त्राचा अभ्यासक्रम 'सोजर कॉलेज ऑफ फार्मसी' येथे शिकवला जातो.
  • उच्च माध्यमिक महाविद्यालये
  • श्री शिवाजी महाविद्यालय (कला व विज्ञान)
  • श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय (कला व विज्ञान)
  • बी.पी.सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स (वाणिज्य)
  • महाराष्ट्र विद्यालय (कला व विज्ञान)
  • राजर्षी शाहू विधी महाविद्यालय
  • निंबाळकर अध्यापक महाविद्यालय
  • अध्यापिका महाविद्यालय

प्रार्थना स्थळे

जैन मंदिर

बार्शीमध्ये जैन मंदिर हे कुर्डुवाडी रोड येथे आहे.

भगवंत मंदिर

जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शीची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णू देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णू मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पूर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 महादेवाची मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे बार्शी हे लोकप्रिय मानले जाते.

इतर आकर्षणे

बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्‍याला वैराग असे म्‍हटले जाते. वैराग हे वैराग्‍याची भुमी म्‍हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्‍या दष्‍टीने वाढत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदिर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैरागमध्‍ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे. बार्शी पासून ८ किलोमीटरवर दडशिंगे गाव आहे. येथे बाळपीर देवाची यात्रा भरते. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे.

वैराग पासून १३ कि.मी वर माढा रोडवर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदिर आहे. हे मंदिर भव्‍य असुन या देवीची अशी कथा सांगितली जाते की या देवीची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहाताएवढया आकाराची होती व सध्‍या ही मुर्ती 5 ते साडे पाच फुट एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवीप्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवीप्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पूर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता ही जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकऱ्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती मातेची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगावचे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन, यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.

श्री.स्वामीनारायण मंदिर

बार्शीमध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री. स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे. हे मंदिर व त्यातील मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.

'श्री निलकंठेश्वर' मंदिर, पांगरी ता.बार्शी

बार्शी शहरापासून 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.

श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर तिर्थक्षेत्र, काळेगाव

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी

मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे ही गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात. केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे. खेड्यामध्ये बसथांबे नसतात ही गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार, अपंग, वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.

तालुक्यातील गावे

  1. आगळगाव
  2. अलीपूर (बार्शी)
  3. आळजापूर
  4. अंबाबाईवाडी
  5. आंबेगाव (बार्शी)
  6. अरणगाव
  7. बाभुळगाव (बार्शी)
  8. बाळेवाडी
  9. बार्शी
  10. बावी
  11. बेळगाव (बार्शी)
  12. भाळगाव
  13. भांदेगाव
  14. भंसाळे
  15. भातांबरे
  16. भोईंजे
  17. भोयरे
  18. बोरगाव (बार्शी)
  19. बोरगाव खुर्द
  20. चारे
  21. चिखर्डे
  22. चिंचखोपण
  23. चिंचोळी
  24. चुंब
  25. दादशिंगे
  26. दहिताणे
  27. देवगाव
  28. धामणगाव
  29. धामगाव
  30. धानोरे
  31. ढेबरेवाडी
  32. ढोराळे
  33. धोत्रे
  34. गाडेगाव
  35. गाताचीवाडी
  36. गौडगाव
  37. घाणेगाव
  38. घारी
  39. घोळवेवाडी
  40. गोडसेवाडी
  41. गोरमाळे
  42. गुळपोळी
  43. हळदुगे
  44. हात्तिज
  45. हिंगणी
  46. इंदापूर
  47. इर्ले
  48. इरलेवाडी
  49. जहानपूर
  50. जामगाव (आ)
  51. जवळगाव
  52. जोतिबाचीवाडी
  53. काळांबावाडी
  54. कळंबवाडी
  55. काळेगाव
  56. कांदळगाव
  57. कापसी
  58. कारी
  59. कासारी
  60. कासरवाडी
  61. काटेगाव
  62. कव्हे
  63. खडकाळगाव
  64. खाडकोनी
  65. खामगाव
  66. खांडवी
  67. कोरेगाव
  68. कोरफळे
  69. कुसलांब
  70. लाडोळे
  71. लक्ष्याचीवाडी
  72. महागाव
  73. मालेगाव
  74. माळवंडी
  75. मामदापूर
  76. मांडेगाव
  77. माणेगाव
  78. मिर्झानपूर
  79. मौजे ताडवळे
  80. मुंगाशी
  81. नागोबाचीवाडी
  82. नांदणी (बार्शी)
  83. नारी
  84. नारीवाडी
  85. निंबाळक
  86. पांधरी (बार्शी)
  87. पाणगाव
  88. पांगरी (बार्शी)
  89. पाथरी (बार्शी)
  90. फाफळवाडी
  91. पिंपळगाव (बार्शी)
  92. पिंपळवाडी (बार्शी)
  93. पिंपरी (बार्शी)
  94. पुरी (बार्शी)
  95. राळेरास (बार्शी)
  96. रास्तापूर
  97. रातंजण
  98. राऊळगाव (बार्शी)
  99. रूई (बार्शी)
  100. साकट
  101. संगमनेर (बार्शी)
  102. सर्जापूर
  103. सारोळे (बार्शी)
  104. सासुरे
  105. सौंदरे
  106. सावरगाव (बार्शी)
  107. शेळगाव (बार्शी)
  108. शेंदरी
  109. शिराळे (बार्शी)
  110. श्रीपतपिंपरी
  111. सुरडी (बार्शी)
  112. ताडसौदणे
  113. तांबेवाडी
  114. तांदुळवाडी (बार्शी)
  115. तावडी
  116. तुर्कपिंपरी
  117. उकडगाव
  118. उंबरगे
  119. उंदेगाव
  120. उपळाई
  121. उपळे (बार्शी)
  122. वैराग
  123. वागाचीवाडी
  124. वाळवड
  125. वाणेवाडी
  126. वांगरवाडी
  127. यावळी (बार्शी)
  128. येळंब
  129. झाडी
  130. झारेगाव
  131. जामगाव पा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate